नवी मुंबईतील गणेशमूर्तींना बॅंकॉकमध्ये मागणी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 July 2019

बाप्पांचे भक्त जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असले, तरी हौसेने गणेश चतुर्थी साजरी करतात. काही जणांना तर त्यासाठी बाप्पाची मूर्तीदेखील भारतातच बनवलेली हवी असते. नवी मुंबईच्या बेलापूर येथील कल्पेश कला केंद्राचे गणपती बाप्पा तर यासाठी गेली अनेक वर्षे बॅंकॉकला जात आहेत.

मुंबई : गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्व जण उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गणपतीची मूर्ती ठरवण्यापासून सजावट, देखावा यांची जय्यत तयारी सुरू आहे. बाप्पांचे भक्त जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असले, तरी हौसेने गणेश चतुर्थी साजरी करतात. काही जणांना तर त्यासाठी बाप्पाची मूर्तीदेखील भारतातच बनवलेली हवी असते. नवी मुंबईच्या बेलापूर येथील कल्पेश कला केंद्राचे गणपती बाप्पा तर यासाठी गेली अनेक वर्षे बॅंकॉकला जात आहेत.

बेलापूर येथील शाबाज गावातील कल्पेश कुंभार यांचा वडिलोपार्जित गणपतीच्या मूर्ती बनवण्याचा व्यवसाय आहे. गेली ७० वर्षे त्यांचे कुटुंब या व्यवसायात आहेत. नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या गणपतींना मागणी आहे. गेल्या काही वर्षांपासून कल्पेश केंद्रातर्फे बॅंकॉक येथे शाडूमाती आणि पीओपीच्या मूर्ती गणेश उत्सवादरम्यान पाठवल्या जातात. 

लालबागचा राजा आणि टिटवाळ्याच्या गणपतीच्या स्वरूपातील डायमंड व खरे कपडे परिधान केलेल्या दीड फुटाच्या या मूर्तींची किंमत साडेचार ते साडेसहा हजारांच्या घरात आहे. साधारण मे महिन्यात या मूर्तींची ऑर्डर येते आणि जुलैमध्येच पॅकिंग करून मूर्ती ट्रान्सपोर्ट केल्या जातात, असे कुंभार यांनी सांगितले. सध्या मार्केटमध्ये बालगणेश, बाजीराव, विठ्ठल, राधा-कृष्ण, शंकर पार्वती अशी जोडपी या स्वरूपातील मूर्तींना जास्त मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. 

लालबागचा राजा आणि टिटवाळ्याच्या गणपतीच्या स्वरूपातील डायमंड व खरे कपडे परिधान केलेल्या दीड फुटाच्या या मूर्तींची किंमत साडेचार ते साडेसहा हजारांच्या घरात आहे. साधारण मे महिन्यात या मूर्तींची ऑर्डर येते आणि जुलैमध्येच पॅकिंग करून मूर्ती ट्रान्सपोर्ट केल्या जातात.
- कल्पेश कुंभार, मूर्तिकार.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demands for Navi Mumbais Ganesh idols in Bangkok