पाडलेले बांधकाम जैसे थे; उच्च न्यायालयाचा कंगना आणि महापालिकेला आदेश

सुनीता महामुणकर
Thursday, 10 September 2020

अभिनेत्री कंगना राणौतच्या पाली हिल येथील बंगल्यावर केलेल्या बांधकामाच्या पाडकामाची स्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिले.

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौतच्या पाली हिल येथील बंगल्यावर केलेल्या बांधकामाच्या पाडकामाची स्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे मुंबई महापालिकेला पुढे कारवाई करता येणार नाही तर, कंगनालाही नव्याने बांधकाम किंवा दुरुस्ती करता येणार नाही. एकप्रकारे कंगनाबरोबर महापालिकेलाही या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख, कंगना राणावत विरोधात विक्रोळीत तक्रार दाखल 

आज न्यायालयात पालिकेने आपल्या कारवाईचे समर्थन केले. बंगल्यातील कार्यालयात नियमबाह्य बांधकाम केल्याचा दावा पालिकेने केला. याबाबत एक प्रतिज्ञापत्रही दाखल करण्यात आले. बंगल्यातच हे काम सुरु होते. तरीही कंगना कांगावा करीत आहे. त्यामुळे तिला न्यायालयाने संरक्षण देऊ नये, असे यावेळी महापालिकेचे विशेष वकील एस. पी. चिनाय यांनी खंडपीठापुढे सांगितले. 

पालिकेने केलेल्या कारवाईविरोधात कंगनाने अॅड रिझवान सिद्दीकी यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने कारवाईला अंतरिम स्थगिती दिली असून महापालिकेच्या प्रतिज्ञापत्रावर खुलासा करण्याचे निर्देशही दिले आहेत.  पुढील सुनावणी 22 संप्टेबररोजी होणार असून पालिका 18 सप्टेंबरपर्यंत पुरवणी प्रतिज्ञापत्रही दाखल करु शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

भीमा कोरेगाव प्रकरण: शरद पवारांनी बोलावली काँग्रेस- राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक 

कंगनाचे आधार आरोपहीन!
कंगना आधारहिन आणि अकारण छळवणुकीचे आरोप करीत आहे. कोणत्याही आकसाने ही कारवाई केलेली नाही, असेही पालिकेच्यावतीने न्यायालयात स्पष्ट करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The demolished buildings High Court order to Kangana BMC