
मोखाडा - पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात डोल्हारा येथे डासांचा उपद्रव झाला आहे. येथे डेंग्युचे 4 तर चिकणगुण्या चे 9 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. या घटनेने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असुन येथे डेंग्यु आणि चिकणगुण्याच्या प्रतिबंधासाठी सर्वेक्षण चालू केले आहे. बाधीत रूग्णांची प्रकृती स्थिर असून प्रत्येक घरटी तपासुन रक्त नमुने घेतले जात आहेत.