
Latest Thane News: शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या विचारांचे खरे वारसदार आपणच असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. कोपरी- पाचपाखाडी या आपल्या बालेकिल्ल्यात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे केदार दिघे यांचा केवळ दारुण परावभ केला नसून त्याच्यांवर डिपोझिटही जप्तीची नामुष्की आणली आहे.
ठाकरे गटाने आनंद दिघे यांच्या पुतण्याला उमेदवारी देऊन दिघे कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण येथील मतदारांनी गेली पंधरावर्षे आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विकासकामांना तब्बल १ लाख ५९ हजार ६० मतांचे दान देत सर्वाधिक १ लाख २० हजार ७१७ इतके मताधिक्य दिले आहे.