उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण, मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

पूजा विचारे
Monday, 26 October 2020

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहे. अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी समोर आलेल्या वृत्तानुसार, खबरदारी म्हणून अजित पवार रुग्णालयात भरती झाले.

मुंबईः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहे. अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी समोर आलेल्या वृत्तानुसार, खबरदारी म्हणून अजित पवार रुग्णालयात भरती झाले. मात्र आताच समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती ठिक नाही आहे. तसंच गेल्या ४ दिवसांपासून अजित पवार विलगीकरणात होते. 

 माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून  प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन. 
-    अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

 

खबरदारी म्हणून दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या छातीचा सीटी स्कॅनही करण्यात आला होता. पण, रिपोर्ट हा नॉर्मल आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षण जाणवू लागली होती. मात्र कोरोनाची चाचणीही निगेटिव्ह आली होती. पण, खबरदारीचा उपाय म्हणून 22 ऑक्टोबरपासून अजितदादांनी स्वत: क्वारंटाइन केले होते. आज अजित पवारांना आज सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Deputy Chief Minister Ajit Pawar at Breach Candy Hospital


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar at Breach Candy Hospital