esakal | रुग्ण वाढ झाली तरी मुंबईकरांनो लॉकडाउनचं टेन्शन नका घेऊ
sakal

बोलून बातमी शोधा

corona-mumbai 2.jpg

अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी नेमकं काय म्हटलय?

रुग्ण वाढ झाली तरी मुंबईकरांनो लॉकडाउनचं टेन्शन नका घेऊ

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबईत मागच्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी वेगवेगळया उपायोजना करुनही रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. उलट त्यात वाढच होत आहे. रोजच्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या मनात लॉकडाउनची भीती वाढत चालली आहे. मुंबई महानगर क्षेत्रात कोरोनामुळे आतापर्यंत २० हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मुंबई पाठोपाठ ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

विदर्भ, मराठवाड्यानंतर कापडासाठी ओळखले जाणारे मालेगाव शहर कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनले आहे. मालेगावमध्ये दररोज ६१ टक्के कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. 

मुंबईत रुग्णवाढ होत असली, तरी लॉकडाउन किंवा नाईट कर्फ्यू लावणार नाही असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितले. "मृत्यूदर नियंत्रणात आहे. दरदिवशी आम्ही २४ हजार कोरोना चाचण्या करत आहोत. त्यामुळे नवीन रुग्ण आढळत आहेत" असे त्यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. 

"व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असला तरी तो तितका धोकादायक नाहीय. ज्यांना गरज आहे, त्यांना पुरेशा प्रमाणात बेडस उपलब्ध व्हावेत, याची आम्ही काळजी घेऊ" असे कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष संजय ओक यांनी सांगितले. राज्यात गुरुवारी रुग्ण पॉझिटिव्ह ठरणाचे प्रमाण २१ टक्क्यांवर पोहोचले, तेच प्रमाण मुंबईत १३ टक्के आहे. 

महाराष्ट्रात कोरोनामुळे आतापर्यंत ५३ हजार १३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी ५८ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मुंबईत ११ हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ११ सप्टेंबर हा पहिल्या लाटेतील सर्वात वाईट दिवस होता. त्यादिवशी राज्यात ४४२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. मुंबईत १० ऑक्टोबरला कोरोनामुळे ४८ रुग्णांनी आपले प्राण गमावले होते. मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हा यंत्रणांना फिल्ड हॉस्पिटल्स सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईत ११ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. 
 

loading image