फडणवीस म्हणतात "मुख्यमंत्र्यांना चौकातील भाषण आणि सभागृहातील भाषण हे अजूनही लक्षात आलेले नाही"

फडणवीस म्हणतात "मुख्यमंत्र्यांना चौकातील भाषण आणि सभागृहातील भाषण हे अजूनही लक्षात आलेले नाही"

मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अशात आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात भाषण केलं. या भाषणात मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ज्यामध्ये शेतकरी आंदोलन, कोरोना काळात वाटप करण्यात आलेलं धान्य, महाराष्ट्र बेळगाव सीमाप्रश्न, सावरकर यांच्याबाबतचा भारतरत्नचा मुद्दा, हिंदुत्त्वाचा मुद्दा, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याबाबतचा मुद्दा असे विविध मुद्धे मांडलेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

उद्धव ठाकरेंचा सुधीर मुनगंटीवारांवर निशाणा : 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे आमदार आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधलेला पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे म्हणालेत की, "मी माझ्या केबिनमध्ये काम करत होतो आणि ऐकत होतो. तर मला नटसम्राट पाहतोय असं वाटत होतं. सुधीरभाऊ तुमची ती कला आहे. ती जिवंत ठेवा मारू नका." 

आज सकाळी सभागृहात जळगावमधील महिला अत्याचाराच्या प्रश्नावरून सुधीर मुनगंटीवार चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रात राष्ट्र्वापती राजवट लावली जावी याची स्वतः मागणी करणार असल्याचं म्हंटलं होतं. ज्यावर उद्धव ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर उपहासात्मक टीका केलेली पाहायला मिळाली.   

उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भाषणांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली. फडणवीस म्हणालेत की, "राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला जी चर्चा झाली त्यासाठी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तब्बल एक तास बोलले. मात्र ते तासाभरात महाराष्ट्रात येऊ शकले नाहीत.

पुढे फडणवीस म्हणालेत की, "मुख्यमंत्री चीनमध्ये गेले, ते पाकिस्तानात गेलेत, ते अमेरिकेत गेलेत ते पंजाबमध्ये गेलेत, ते उत्तर प्रदेशात गेलेत, बिहारमध्ये गेलेत, काश्मीरमध्ये गेलेत, साऊथमध्ये गेलेत. मात्र महाराष्ट्राबाबत सभागृहात एकही वाक्य ते बोलू शकले नाहीत."

चौकातील भाषण आणि सभागृहातील भाषण हे अजूनही लक्षात आलेले नाही

"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता जुने झालेले आहेत. मात्र माननीय मुख्यमंत्र्यांना चौकातील भाषण आणि सभागृहातील भाषण हे अजूनही लक्षात आलेले नाही. सभागृहात उपस्थित मुद्द्यांवर बोलावं लागतं राज्याच्या प्रश्नांवर बोलावं लागतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या संदर्भात एकही मुद्दा मांडला नाही.  शेतकऱ्यांबाबत एकही मुद्दा मुख्यमंत्र्यांनी काढला नाही. महाराष्ट्रात साडे तीन लाख शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना सिंघू बॉर्डरवर बसलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडली जातेय अशी मुख्यमंत्र्यांना चिंता असल्याचं फडणवीस म्हणालेत.

आज मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेलं उत्तर, या उत्तरकरता 'भ्रमनिरास' हा अतिशय लहानसा शब्द असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.  

leader of opposition devendra fadanavis targets maharashtra CM uddhav thakecray  after his speech in the house

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com