esakal | इंधन दरवाढीविरोधात आंदोलन म्हणजे नौटंकी- देवेंद्र फडणवीस
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. मुंबईत पेट्रोलच्या किंमती 107 रुपयांच्या आजपास आहेत, तर डिझेलच्या किंमतीने 100 रुपये प्रति लिटरकडे आगेकूच केली आहे.

इंधन दरवाढीविरोधात आंदोलन म्हणजे नौटंकी- देवेंद्र फडणवीस

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मुंबई- देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. मुंबईत पेट्रोलच्या किंमती 107 रुपयांच्या आजपास आहेत, तर डिझेलच्या किंमतीने 100 रुपये प्रति लिटरकडे आगेकूच केली आहे. या मुद्द्यावरुन काँग्रेस भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ राज्यपालांना निवेदन देण्यासाठी सायकलवर गेले होते. या मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसचे हे आंदोलन नौटंकी असल्याचं ते म्हणाले आहेत. (devendra fadanvis said about congress cycle rally over petrol disel price hike knp)

पेट्रोल-डिझेल वाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज मुंबईत आंदोलन केले. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, इंधनातून राज्य सरकारला थेट 30 रुपये मिळतात. तसेच केंद्राला जितके मिळतात, त्यातील 12 रुपये पुन्हा राज्य सरकारला दिले जातात. माझ्या माहितीप्रमाणे मागील वर्षी सरकारला पेट्रोल-डिझेलमधून 24 हजार कोटी रुपये कर मिळाला. त्यामुळे राज्य सरकारच्या मनात असेल तर सर्वसामान्यांना दिलासा देऊ शकतं. सरकारने इंधनावरील टॅक्स कमी करावा. काँग्रेसचे आज होत असलेले आंदोलन नौटंकी आहे, असं फडणवीस म्हणाले.

हेही वाचा: OBC आरक्षणप्रकरणी भुजबळांनी नेतृत्व करावं- देवेंद्र फडणवीस

दरम्यान, वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता हैराण आहे. अशा स्थितीत केंद्र सरकार लोकांना दिलासा देण्याच्या कोणाताही प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे लोकांमध्ये रोष आहे. याचा फायदा घेत काँग्रेस या मुद्द्यावरुन आक्रमक झाली आहे. काँग्रेसने शनिवारी मुंबईत इंधन दरवाढीविरोधात मोर्चा काढला होता. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी (Congress Workers) या मोर्चासाठी खास बैलगाडी (bullock cart) आणली होती. त्यानंतर आज काँग्रेस नेत्यांनी सायकलवर जाऊन राज्यपालांना निवेदन दिलं.

loading image