Devendra Fadnavis News|'हनुमान चालिसा हा राजद्रोह असेल तर आम्ही तो करणार', ठोकशाहीला जशास तसं उत्तर देणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis Latest Marathi News

'हनुमान चालिसा हा राजद्रोह असेल तर आम्ही तो करणार', ठोकशाहीला जशास तसं उत्तर देणार

हल्ला झाल्यानंतर किरीट सोमय्यांनी थेट दिल्ली गाठत गृहसचिव अजय भल्ला आणि गृहराज्यमंत्र्यांची भेट घेतली. या हल्ल्याचा निषेध करत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे सरकार आणि पोलिसांवर निशाणा साधला. विरोधी पक्षाला जीवानीशी संपवायचं, अशी प्रवृत्ती सरकारची असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

भोंग्यांबाबत गृहमंत्र्यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. मनसेच्या वतीने बाळा नांदगावकर यांनी बैठकीला उपस्थिती लावली. मात्र, भाजपने या बैठकीला पाठ फिरवली. यावर बोलताना संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा, असं फडणवीस म्हणाले. आजच्या बैठकीला बोलावलं होतं. पण या सरकारला आता संवाद करायचा नाही. त्यामुळे अशा बैठकीला उपस्थिती लावून काही फायदा नसल्याचं विरोधीपक्षनेत्यांनी म्हटलं. ही बैठक म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, असं फडणवीस म्हणाले.

पोलिसांच्या समक्ष हल्ले करणार असतील आणि त्याविरोधात एफआयर नोंदवण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर अशा बैठकीत बसून फायदा काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री या बैठकीला नसतील तर आम्ही जाऊन काय करू, असं फडणवीस म्हणाले.

  • राज्यात अशी परिस्थिती कधीही पाहिली नाही

  • विरोधी पक्षाला जीवे मारण्यासाठी हे कारस्थान आहे

  • बीएमसीतील भ्रष्टाचार आम्ही लोकांसमोर मांडला

  • ज्यांना लोकशाही मान्य नाही त्यांनी आमच्या आंदोलनावर हल्ला केला

  • अशा प्रकारचे हल्ले करून आम्ही बोलणं बंद करण्याचा मविआ सरकारचा प्रयत्न

  • पण भाजपची भ्रष्टाचाराविधातील मोहीम सुरूच राहिल

  • पोलिसांना माहिती असूनही भाजप नेत्यांवर हल्ले झाले

  • मोहित कंबोज यांच्यावर मॉब लिंचिंगचा प्रयत्न झाला

Web Title: Devendra Fadnavis Alleges Mumbai Police Over Kirit Somaiya Attack

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Devendra Fadnavis
go to top