
अजित पवारांच्या शब्दाला काही किंमत नाही, आधिवेशनाआधी फडणवीसांची टीका
राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू होण्याआधीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरवर तत्काळ बैठक बोलावली. याला राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी उपस्थिती लावली. यानंतर भाजपाच्या कार्यकारणीची बैठक झाल्यानंतर विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. (Devendra Fadnavis Alleges Nawab malik)
यावेळी त्यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांचे गँगस्टर दाऊदसोबत संबंध आहेत. मुंबईत दहशतवाद पसरवणाऱ्या व्यक्तींना पाठिशी घालणाऱ्या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
आम्हाला चर्चा करण्यात इंटरेस्ट आहे. अनेक वर्षांनंतर १७-१८ दिवस चालणारं अधिवेशन आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही समोर जाऊ. विरोधकांची मुस्काटदाबी करून लोकशाही पायदळी तुडवली, त्यानुसार आम्हालाही या सगळ्याचा विचार करावा लागेल, असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन कापण्यात येत आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी दिलेल्या शब्दाला तिलांजली दिली जात आहे. त्यामुळे या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शब्दाला किंमत उरली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
काय म्हणाले फडणवीस?
मराठा समाज आणि ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा
छत्रपती घराण्यातील व्यक्तीला उपोषणाला बसावं लागतं, हे असंवेदनशीलपणाचं लक्षण
सारखी, महाज्योती बंद पाडण्याचं काम सुरू आहे
ओबीसी समाजावर या सरकारचा इतका राग का, ओबीसी नेत्यांच्या आंदोनलाखाली अंधार
हे सरकार बेवड्यांना समर्पित.. सरकारला फक्त दारूविक्री करणाऱ्यांचा मोह
अशा प्रकारचे गंभीर आरोप होत असताना जनाची नही तर, मनाची तरी बाळगली पाहिजे
स्वत: कांगावा करायचा आणि विरोधकांच्या नावे बोंब करायची
१२ कोटी जनता सरकारचा अहंकार बाहेर काढेल...महाराष्ट्र तुम्हाला झुकवेल
सरकारमधील काही लोकं दाऊदची धुणीभांडी करतात
Web Title: Devendra Fadnavis Demands Resignation Of Nawab Malik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..