कॉंग्रेसचा आरे व्यापारीकरणाचा प्रस्ताव फडणवीसांनी हाणून पाडला; शेलारांचे प्रत्युत्तर

कृष्ण जोशी
Saturday, 7 November 2020

आरेच्या भूखंडाचे श्रीखंड खाऊन त्याचा व्यापारी वापर करण्याचा निर्णय 2014 मध्येच कॉंग्रेस सरकारने घेतला होता; मात्र तो नंतरच्या भाजप सरकारने हाणून पाडला.

मुंबई  ः आरेच्या भूखंडाचे श्रीखंड खाऊन त्याचा व्यापारी वापर करण्याचा निर्णय 2014 मध्येच कॉंग्रेस सरकारने घेतला होता; मात्र तो नंतरच्या भाजप सरकारने हाणून पाडला. आता आरेचे व्यापारीकरण होणार नाही, असे वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावे, असा प्रतिहल्ला भाजप नेते तथा आमदार ऍड. आशीष शेलार यांनी केला आहे. 

नॉन कोव्हिड खाटांसाठी टास्क फोर्सची शिफारस; खासगी रुग्णालयांचा फॉर्म्युला 60:40 वर आणण्याचा सल्ला

आरेच्या भूखंडाचे व्यापारीकरण करता यावे यासाठी कांजूरमार्गच्या मेट्रो कारशेडचा प्रकल्प फडणवीस सरकारने मोडीत काढून तो आरेमध्ये नेला, असा आरोप आज कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. त्याला उत्तर देताना शेलार यांनी आज पुन्हा सावंत यांच्या अतिशहाणपणामुळे त्यांच्या अज्ञानाचे प्रदर्शन झाले, अशी जळजळीत टीका केली. 

चित्रपटगृहांच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारचे प्राधान्य; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्‍वासन

भूखंडाचे श्रीखंड खाण्याचा कॉंग्रेस संस्कृतीचा डाव 2014 मध्येच होता. 3 मार्च 2014 मध्ये तत्कालीन कॉंग्रेस मुख्यमंत्र्यांनी आरेच्या मेट्रो कारशेडचा भूखंड नाममात्र दराने एमएमआरडीएला देऊन त्याचा व्यावसायिक वापर करावा, अशी मुभा दिली होती; मात्र तो निर्णय नंतर फडणवीस सरकारने हाणून पाडला व त्या जागेचा व्यावसायिक वापर न करता फक्त मेट्रो कारशेडसाठीच वापर होईल, असे भाजप सरकारने 9 नोव्हेंबर 2017 मध्ये ठरविले. अशाप्रकारे मेट्रो कारशेड जमिनीचा व्यापारी वापर करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न भाजप सरकारने रद्द केला हेच दिसत असल्याचे शेलार यांनी सांगितले. 

devendra Fadnavis rejected the Congress proposal for commercialization Shelars reply

--------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra Fadnavis rejected the Congress proposal for commercialization Shelars reply