महापालिकेत घोटाळेच घोटाळे! मुंबईला देण्याऐवजी लुटण्याचं काम सुरु: फडणवीस

fadnvis
fadnvis

मुंबई: देवेंद्र फडणवीसांनी आज विधीमंडळामध्ये मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा पाढा वाचून दाखवला आहे. येत्या काही महिन्यांमध्येच मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर आधीच राजकारण तापलेलं असून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या कारभावर टीका करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलंय की, मुंबई महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार असून पालिकेला सोन्याचं अंडं देणारी कोंबडी समजत आहेत. मुंबईला देण्याऐवजी लुटण्याचं काम सुरु केलंय. (Devendra Fadnvis over BMC)

fadnvis
"छोटं का होईना, भाषण ऐकायला मिळालं"; फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

पुढे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की, कोरोना काळात काढलेल्या सर्व कंत्राटात घोटाळे झाले आहेत. नालेसफाईत घोटाळा, रस्ते चर भरण्यात घोटाळा, टॅब खरेदीत घोटाळा, कोविड सेंटरमध्ये घोटाळा, सामग्री घोटाळा, पदाधिकारी काम दिले, आश्रय घोटाळा, पेंग्विन घोटाळा, उद्यान विकास घोटाळा, बेस्ट तिकीट निविदा घोटाळा अशी परिस्थिती मुंबई महापालिकेत आहे. मुंबई मेली तरी चालेल पण आपलं घर भरलं पाहिजे, अशी वृत्ती आहे. मात्र, यावर आम्ही बोललो तर आम्ही मुंबई मराठी माणसाचे शत्रू ठरतो. (Devendra Fadnvis)

fadnvis
मुंबईचा विचार कायम सोन्याचं अंड देणारी कोंबडी असा केला गेला - उद्धव ठाकरे

पुढे त्यांनी सवाल केलाय की, मुंबईत मराठी माणसाला लुटून खाणारे दैवत का? मुंबईचा मराठी असो की अमराठी असो, प्रत्येकाला कळलंय की प्रेताच्या टाळू वर लोणी कोणी खाल्ल आहे. मात्र, या घोटाळ्याविरोधात आम्ही बोलले तर आम्हाला शत्रू ठरवतात. मुंबई महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार असून पालिकेला सोन्याचं अंडं देणारी कोंबडी समजतात.

पुढे फडणवीसांनी म्हटलंय की, कुठल्याही टेंडरविना कंत्राटं मुंबई पालिकेनं काढली आहेत. पाच कॉविड सेंटर १०० कोटीचं काम नातेवाईकांनाच दिले. कंत्राट देऊन थांबले नाहीयेत, 38 कोटी रुपये अतिरिक्त दिले आहेत. मुंबईला काही देण्याऐवजी लुटण्याचं काम केलंय. कोरोना काळात अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांना कंत्राटं देण्यात आली आहेत. चार महिन्यानंतर ही कंत्राटं रद्द करण्यात आली आहेत. (Devendra Fadnvis)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com