`सीवूड्सच्या राजा`चे भक्त विजेच्या धक्क्याने जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

सिऊड्सचा महाराजा गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू असताना रात्री बाराच्या सुमारास हायटेन्शन वायरच्या धक्क्याने 7 तरुण जखमी झाले. त्यातील 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

नवी मुंबई, ता. 13 (बातमीदार) : सिऊड्सचा महाराजा गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू असताना रात्री बाराच्या सुमारास हायटेन्शन वायरच्या धक्क्याने 7 तरुण जखमी झाले. त्यातील 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

नेरुळ सेकटर 48 येथील सिवूडसचा महाराजा गणपतीची विसर्जन मिरवणूक रात्री उशिराने दारावे तलावाच्या दिशेने निघाली होती. ही मिरवणूक सिवूड उड्डाण पुलावरून चौकात आल्यानंतर मूर्तीच्या सजावटीचा भागाचा स्पर्श हायटेन्शन वायरला झाल्याने सजावटीने पेट घेतला व सजवटीतून विद्युत प्रवाह खाली उतरल्याने 7 तरुणांना विजेचा धक्का बसला. 

आशिष पारकर, शाम झावरे, प्रसाद पिसे, हरिश्चंद्र फाळके, योगेश निकम यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सागर वालीका या तरुणास डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A devotee of the King of the Seawoods was injured by electric currunt