'आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करून मुंडे यांनी माझ्यावर वेळोवेळी अत्याचार केले'; रेणू शर्माचे पुन्हा खळबळजनक आरोप

'आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करून मुंडे यांनी माझ्यावर वेळोवेळी अत्याचार केले'; रेणू शर्माचे पुन्हा खळबळजनक आरोप

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर लैगिक छळाचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. मुंडे यांनी वारंवार जबरजस्ती करत आपल्यासोबतच्या संबध ठेवले तसेच त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचा आरोप शर्मा या महिलेने लावला आहे.

एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना रेणू शर्मा यांनी पुन्हा धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. मुंडे आपले 2006 पासून लैंगिक शोषण करीत असल्याचे त्या महिलेने म्हटले आहे.

आपल्यावर 2006 पासून अत्याचार होत असताना आता आपण एवढ्या उशीरा का तक्रार करीत आहात ?

शर्मांनी उत्तर दिले की, वेळोवेळी स्थापित केलेल्या शारिरीक संबधांचे व्हिडिओ मुंडे यांनी रेकॉर्ड केले होते. तर त्यामुळे ते नेहमी मला धमकवत असत. मी तुझे करिअर सेट करेन, तुझ्याशी लग्न करेन असे अमिष दाखवत मुंडेंनी माझा वापर केला. 

कृष्णा हेगडे यांनी देखील तुमच्यावर ब्लॅकमेलिंगचे आरोप केले आहेत, त्याबाबत काय सांगाल?

हेगडे यांचा मी सन्मान करते. त्यांच्याशी माझा काही संबध नाही. ते मुंडे यांचे चांगले मित्र आहेत. त्यांची राजकीय मैत्री असावी म्हणून ते मुंडेच्या सांगण्यावरून असे आरोप करीत असावेत.

मनीष धुरी यांनीदेखील आपल्यावर आरोप केले आहेत. त्यांच्याशी कसा संपर्क आहे?

मनीश यांना मी गाण्याच्य़ा अल्बम संदर्भात भेटले होते. त्यांची मला मदत हवी होती. त्याव्यतिरिक्त त्यांच्याशी कोणताही वयक्तिक संपर्क माझ्याशी नव्हता. आता ते जे आरोप करीत आहेत ते खोटे आहेत.

सरकारकडून काही अपेक्षा आहेत का?

धनंजय मुंडे यांनी माझ्यावर केलेल्या अत्याचारामुळे मला न्याय मिळावा. मला पक्ष, राजकारणाशी घेणे देणे नाही. मुंबई आणि महाराष्ट्राच्या धर्तीला मी नमन करते. की माझ्यात कॅबिनेट मिनिस्टरच्या विरोधात लढण्याची हिम्मत आली. मला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने मदत करावी.

dhananjay Munde tortured me from time to time by recording offensive videos Renu Sharmas sensational allegations again

---------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com