धोलवड दवाखाना ते कोलपाडा खाडी रस्ता वाहतुकीसाठी खुला

अच्युत पाटील
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

बोर्डी -  धोलवड सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पूलापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अल्पावधीत पुर्ण करण्या आले असुन, बुधवार दिनांक 12 डिसेंबर रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

बोर्डी -  धोलवड सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पूलापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अल्पावधीत पुर्ण करण्या आले असुन, बुधवार दिनांक 12 डिसेंबर रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

डहाणु-चिखले मार्गे धोलवड आणि बोर्डी गावाला जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पुला पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली होती. गेल्या पंचविस वर्षात सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याच्या मजबुतीकरणाचा विचार केला नव्हता. दुचाकी, चारचाकी वाहने चालविणे तसेच पायी चालणे देखील येथे कठिण झाले होते. पावसाळ्यात फुट, दोनफुट खोल खड्डे पडत असल्याने वाहानचालकांना कसरत करावी लागत असे. याकरिता सकाळ दैनिकातुन सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानतंर या पुलाची दुरुस्ती करण्यात आली.

वारंवार पाठपुरावा करुनही दखल घेतली जात नसल्याचे पाहुन स्थानीक ग्रामस्थांनी आंदोलन छेडण्याचा इशारा देताच सार्वजनीक बांधकाम विभागाची झोप उडाली होती.
जानेवारी 2018 तातडीने पारनाका ते झाई पर्यंतच्या मार्गाचे मजबुती करणाच्या कामासाठी तीन कोटी 80 लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. मे महिन्याच्या अखेरिस म्हणजेच पावसाळ्यापुर्वी काम पुर्ण करण्यात येणार होते. परंतु तात्कालीन खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक लागल्याने आचारसहितेचे कारण पुढे करुन काम पुढे ढकलण्यात आले होते.

दरम्यान पासाळ्यात या रस्त्याची पार दुरावस्था झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर वेगाने हालचाली करुन दिवाळीच्या 10 नव्हेंबर पासुन काम सुरू करण्यात येणार होते. परंतु पर्यायी मार्ग सुरक्षित नसल्याचे कारण सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावित मार्ग दुरुस्तिच्या कामासाठी वाहतुक बंद करण्यास परवानगी नाकरल्याने काम लांबले. अखेर सर्व प्रकारच्या प्रक्रिया पुर्ण झाल्यवर 30 नव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत डहाणु-बोर्डी मार्गावरील वाहतुक पुर्णपणे बंद करून ठेकेदार आशिष सावे यांनी काम पुर्ण केले. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्याने नागरिक समाधान व्यक्त केले जाते आहे.

 

 

Web Title: Dholawad hospital to kolpada khadi bridge is open for traffic