नवी मुंबई विमानतळाचा वाद मिटेना! हाती मशाल घेऊन होणार आंदोलन

नवी मुंबई विमानतळाचा वाद मिटेना! हाती मशाल घेऊन होणार आंदोलन दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याचा भूमिपुत्रांचा आग्रह Di Ba Patil Navi Mumbai Airport Naming Issue Local People warning Agitation with mashal lamp vjb 91
नवी मुंबई विमानतळाचा वाद मिटेना! हाती मशाल घेऊन होणार आंदोलन

दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याचा भूमिपुत्रांचा आग्रह

पनवेल: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे. त्यासाठी ९ ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी जासई येथे मशाल हातात घेऊन निदर्शने करण्यात येणार आहेत. या संदर्भात उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली. विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्यावे, असे भूमिपूत्रांचे ठाम मत असतानाही राज्य सरकार याची दखल घेत नाही. त्यामुळे कृती समितीकडून ऑगस्ट क्रांती दिनी म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मशाल हातात घेऊन निदर्शनाच्या मध्यमातून एल्गार पुकारला जाणार आहे

आंदोलनाची रणनिती ठरताना पदाधिकारी
आंदोलनाची रणनिती ठरताना पदाधिकारी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने यापूर्वी १० जून रोजी मोठे जनआंदोलन केले होते. तर २४ जून रोजी पुन्हा आंदोलनाच्या माध्यमातून यासाठी लढा उभारण्यात आला. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यांत जवळपास १५ ठिकाणी मानवी साखळी केली होती. १०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर शांततेच्या मार्गाने व कोरोनाचे नियम पाळून साखळी तयार करून सरकारचे लक्ष वेधून घेतले होते. इतके मोठे आंदोलन होऊनही राज्य सरकार याची दखल घेत नसल्याने कृती समितीने ऑगस्ट क्रांतिदिनी म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मशाल मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com