esakal | गॅंगरिन झालेला पाय थोडक्यात बचावला, मधुमेहाच्या त्रासाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात 
sakal

बोलून बातमी शोधा

गॅंगरिन झालेला पाय थोडक्यात बचावला, मधुमेहाच्या त्रासाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात 

मधुमेहाकडे दुर्लक्ष करणे मुंबईतील एका 60 वर्षीय व्यक्तीला महागात पडलं आहे. लॉकडाऊनमुळे उपचारास विलंब केल्यानं या व्यक्तीच्या डाव्या पायाला (गॅंगरिन) गंभीर दुखापत झाली होती.

गॅंगरिन झालेला पाय थोडक्यात बचावला, मधुमेहाच्या त्रासाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात 

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : मधुमेहाकडे दुर्लक्ष करणे मुंबईतील एका 60 वर्षीय व्यक्तीला महागात पडलं आहे. लॉकडाऊनमुळे उपचारास विलंब केल्यानं या व्यक्तीच्या डाव्या पायाला (गॅंगरिन) गंभीर दुखापत झाली होती. वेळीच उपचार मिळाले नसते तर पाय गमवावा लागला असता. मात्र, चेंबूरच्या एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून या व्यक्तीचा पाय वाचवला आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक लोक भितीपायी स्वतःच्या आजाराकडे दुर्लक्ष करतात. पण, वेळीच उपचार न झाल्यास आजार बळावू शकतो. 

चेंबूरमध्ये राहणारे पंकज शहा (नाव बदललेलं) मागील 15 वर्षांपासून शहा मधुमेहाने ग्रस्त होते. कोरोनाच्या कालावधीत पायाला दुखापत झाली होती. परंतु, लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडण्याची भिती वाटत असल्याने त्यांनी या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं. साधारणतः एक महिन्यांनंतर त्यांनी स्थानिक डॉक्टरांना दाखवल्यावर त्यांनी पाय कापण्याचा सल्ला दिला. मात्र, काहीही करून पाय वाचला पाहिजे, यासाठी कुटुंबियांनी त्यांना तातडीने 7 जुलै रोजी रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर कुटुंबियांच्या परवानगीनुसार 13 जुलै रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. 

मोठी बातमी असं जंगल तुम्हाला माहितीये का ? इथं रात्रभर ओरडतात आत्मा, ना मिळतं मोबाईलला नेटवर्क, ना समजते दिशा

रक्तातील साखरेकडे करु नका दुर्लक्ष- 

रूग्णाच्या डाव्या पायाच्या खाली गंभीर (गॅंगरीन) दुखापत झाली होती. अनियंत्रित रक्तातील साखरेच्या पातळीकडे दुर्लक्ष केल्याने ही समस्या उद्भभवली होती. जेव्हा आपल्या शरीराच्या विशिष्ट भागात रक्तप्रवाहात व्यत्यय येतो, अशी स्थितीत गॅंगरीन होण्याची शक्यता बळावते. या रूग्णाची दुखापत जास्त असल्याने वेळीच उपचार झाले नसते तर पाय गमवावा लागला असता. सध्या ही जखम खुली असल्याने आणखी एक शस्त्रक्रिया आवश्यक आहे. असं झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. रॉय पाटणकर म्हणालेत.  

उपचारांआभावी होतेय गंभीर स्थिती -

अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात लोक कोविडच्या संसर्गाच्या भीतीमुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात आणि गंभीर परिस्थितीत स्वतःवर ओढावून घेतात. याशिवाय साथीच्या आजारामुळे लोक डॉक्टरांना भेटायला घाबरत असून स्वतःच औषधोपचार घेतात आणि उपचाराला उशीर झाल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रूग्णालयात येतात. अशा स्थितीत उपचार करणं डॉक्टरांसाठी अवघड जातं. काहींना शस्त्रक्रियाची आवश्यकता असते. त्यामुळे त्वरित उपचार घेतल्यास या आजारातून पूर्णपणे बरं होता येऊ शकतं.

( संपादन - सुमित बागुल )

diabetes lead to gangrene take almost care read full story

loading image