esakal | #COVID:राज्यातील आकडा 4 हजाराच्या वर; एकाच दिवसात 552 नवे रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आज राज्यात  12  करोना बाधित रुग्णांचा मृत्यू, राज्यातील एकूण रुग्ण 4200

करोना बाधित रुग्ण 

#COVID:राज्यातील आकडा 4 हजाराच्या वर; एकाच दिवसात 552 नवे रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आज राज्यात 552  नवीन रुग्णांचे निदान झाले असून राज्यातील एकूण बाधित रुग्णांचा आकडा चार हजाराच्यावर गेला आहे. तर आज राज्यात 12 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 507 करोना बाधित रुग्ण आजारातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले.


आज राज्यात 552 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 4200  झाली आहे. राज्यात 12 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई  येथील 6 आणि मालेगाव येथील 4  तर 1 मृत्यू सोलापूर मनपा आणि 1 मृत्यू जामखेड अहमदनगर येथील आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी  4  पुरुष तर 8  महिला आहेत.

हेही वाचा...तुमची कार व्हायरसला 'अस' संपवणार 

आज झालेल्या 12  मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील  6 रुग्ण आहेत तर 5  रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत तर एक रुग्ण 40 वर्षांखालील आहे.  मालेगाव येथील मृत्युमुखी पडलेल्या 4 रुग्णांना इतर काही आजार आहेत का याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.  उर्वरित 8 जणांपैकी 6 रुग्णांमध्ये ( 75 %)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 223 झाली आहे. 


आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 72,023 नमुन्यांपैकी 67,673 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 4200 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

हेही वाचा...कोरोनापासून आईही मुलाचे संरक्षण करू शकते 


राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या  368 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 6359 सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 23.97 लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.  

  507 रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले

आजपर्यंत राज्यातून 507 रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 87,254 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 6,743 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.