सुशांतची आत्महत्या की हत्या? सीबीआयने लवकरात लवकर निकाल द्यावा; अनिल देशमुखांचा पुन्हा सवाल

तुषार सोनवणे
Friday, 2 October 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिस चौकशी करत असताना अचानक त्यांच्याकडून हे प्रकरण काढून केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (सीबीआय) सोपवण्यात आले.

 

मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिस चौकशी करत असताना अचानक त्यांच्याकडून हे प्रकरण काढून केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (सीबीआय) सोपवण्यात आले. परंतु गेल्या गेल्या दीड महिण्यापासून सीबीआय तपास करीत आहे. त्यांनी केलेल्या चौकशीत सुशांतची हत्या झाली की, आत्महत्या या निकालाची आम्ही प्रतिक्षा करीत आहोत. असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले.

नवी मुंबईत ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर; पुन्हा कठोर नियम, आयुक्तांचे आदेश

मुंबई पोलिस या प्रकरणाचा योग्यरित्या आणि खोलात जाऊन तपास करीत होते. परंतु नंतर हा खटला सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. आता तुमच्या चौकशीलाही बराचवेळ झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर सांगा की, सुशांतची आत्महत्या झाली की हत्या? असे पुन्हा एकदा अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. देशमुख यांनी 30 सप्टेंबर रोजी देखील सीबीआयने आतापर्यंंत काय चौकशी केली त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी देशमुख यांनी भाजपवर देखील टीका केली होती. बिहार निवडणूकांपूर्वी एका राष्ट्रीय पक्षाने स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला.असे देशमुख म्हणाले होते. एम्सच्या अहवालानुसार सुशांतसिंहच्या शरिरात कोणताही विषाचा प्रकार आढळून आला नाही.  फॉरेंन्सिक टीम सुशांतच्या मुंबई येथील घरी येऊन गेली. त्या टीमला ही अद्याप या घटनेत अक्षेपार्ह काही आढळून आलेले नाही. 

परिसरातील स्वच्छता तर होईल, मानसिक स्वच्छतेचे काय? महिलांच्या सुरक्षिततेबाबत मनसेचा सवाल

बिहार सरकारच्या सूचना केंद्राने मान्य करत रिया चक्रवती विरोधात एफआयआर दाखल केला होता. लोकं सीबीआयच्या निकालाची वाट पाहत आहेत. त्यांनी लवकरात लवकर सुशांतच्या मृत्यू बाबतचा निकाल द्यावा असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे.

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: did sushant die by suicide or murder maharashtra home min asks cbi