esakal | अंतिम सत्राच्या परीक्षा अडचणीत; मुंबई विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून लेखणी बंद आंदोलन  
sakal

बोलून बातमी शोधा

अंतिम सत्राच्या परीक्षा अडचणीत; मुंबई विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून लेखणी बंद आंदोलन  

राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासह इतर 10 प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु झाले आहे

अंतिम सत्राच्या परीक्षा अडचणीत; मुंबई विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून लेखणी बंद आंदोलन  

sakal_logo
By
तेजस वाघमारे


मुंबई : राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासह इतर 10 प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु झाले आहे. तरे मुंबई विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सोमवारपासून लेखणी बंद आंदोलनास प्रारंभ होणार आहे. राज्यभरातील विद्यापीठांमधील आंदोलनांमुळे राज्यभरातील अंतिम सत्राच्या परीक्षा संकटात आल्या असून निकालावरही याचा परिमाण होणार आहे.

घाटकोपरमध्ये असंख्य वाहने जळून खाक; कोणीतरी जाणीवपूर्वक आग लावल्याचे आरोप

राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, सेवांतर्गत प्रगती योजना पुनर्जीवित करणे यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक कृती समितीमार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे. यानंतरही सरकारकडून आश्वासनांशिवाय ठोस निर्णय घेण्यात येत नसल्याने राज्यभरातील विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतिम सत्राच्या परीक्षा राज्यभरातील विद्यापीठांमार्फत घेण्यात येत असतानाच अधिकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्याने याचा परिणाम परीक्षा आणि निकालावर होणार आहे.

मुंबई विद्यापीठ शिक्षक, अधिकारी, कर्मचारी समन्वय समितीमार्फत 28 सप्टेंबरपासून लेखणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यांदोलनादरम्यान कोणताही कर्मचारी कार्यालयीन कामे करणार नाही. परंतु कामावर आल्याची हजेरी लावणार आहेत. या आंदोलनांनंतरही सरकारने मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास 1 ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. अंतिम सत्राच्या परीक्षा व निकालाची कामे करणारे अधिकारी कर्मचारीच काम बंद आंदोलन करणार असल्याने परीक्षेचे निकालही रखडणार आहेत.

हे आंदोलन सरकारने लादले असून त्याला सरकार सर्वस्वी जबाबदार आहे. विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांची सोडवणूक झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही.
- दीपक घोणे,
समन्वय समिती निमंत्रक

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top