
किन्हवली : राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ यांची आदर्श विचारांची अमूल्य शिकवण व छत्रपती शिवरायांच्या आदर्श विचारांचा जागर करण्यासाठी शहापूर तालुक्यातील एक विचारधारा चारिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून किल्ले माहुली ते शिवनेरी किल्ला अशी शक्ती भक्ती पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले असून हि दिंडी नववर्षाच्या प्रारंभी शिव जन्मस्थळावर पोहोचणार आहे.