दिनेश जैन मुख्य सचिवपदी निश्‍चित

मृणालिनी नानिवडेकर
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना राज्यातील नोकरशाहीत व्यापक बदल होणार आहेत. मलिक यांच्या निरोप समारंभांना प्रारंभ झाला असून, दिनेश कुमार जैन या सचोटीच्या अन्‌ कार्यक्षम अधिकाऱ्याला मुख्य सचिवपदी नेमले जाणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. त्यामुळे सेवाज्येष्ठतेत क्रमांक एकवर असलेल्या मेधा गाडगीळ यांना ही संधी मिळणार नाही हेही स्पष्ट झाले आहे.

मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना राज्यातील नोकरशाहीत व्यापक बदल होणार आहेत. मलिक यांच्या निरोप समारंभांना प्रारंभ झाला असून, दिनेश कुमार जैन या सचोटीच्या अन्‌ कार्यक्षम अधिकाऱ्याला मुख्य सचिवपदी नेमले जाणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. त्यामुळे सेवाज्येष्ठतेत क्रमांक एकवर असलेल्या मेधा गाडगीळ यांना ही संधी मिळणार नाही हेही स्पष्ट झाले आहे.

जैन हे 1982 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. मेधा गाडगीळ यांना या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळही मिळू शकली नसल्याचे समजते. सुधीर श्रीवास्तव, सुनील पोरवाल आणि यूपीएस मदान यांची सेवाज्येष्ठताही डावलली जाणार असून, या तिघांनाही नव्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत. मुख्य सचिवांची निवड हा संपूर्णत: मुख्यमंत्र्याचा अधिकार असतो असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बदलीचे आदेश उद्या किंवा 30 एप्रिल रोजी निघतील असे समजते. राजकीय निर्णय प्रत्यक्षात आणू शकणारे चेहरे निवडण्यावर फडणवीस यांचा भर असेल असे समजते.

दिनेशकुमार जैन अत्यंत कुशल प्रशासक आहेत. दहा वर्षे त्यांनी दिल्लीत कृषी खाते अन्‌ संबंधित विषय हाताळले. ते दोन वर्षांपूर्वी राज्यात परतले आहेत. त्यांच्याच तुकडीतील गाडगीळांसह अन्य तीन अधिकारी त्यांना ज्येष्ठ आहेत. सनदी सेवेत तुकडीतील ज्येष्ठता जन्मतारखेनुसार नव्हे, तर गुणवत्तेनुसार ठरवली जाते. मेधा गाडगीळ परीक्षेत पहिल्या आल्या होत्या. या तुकडीतील अतिरिक्‍त मुख्य सचिव होण्याचा मान त्यांनाच मिळाला आहे. यापूर्वीही अजित निंबाळकर, अरुण बोंगीरवार यांनाही सेवाज्येष्ठता डावलून मुख्य सचिव करण्यात आले होते.

महत्त्वाच्या खात्यातील अधिकारीही बदलले जाणार आहेत. एमएमआरडीएचे प्रमुख असलेले यूपीएस मदान यांना जैन यांच्या जागी वित्त सचिव केले जाईल. सुधीर श्रीवास्तव यांचा सेवाकाळ जेमतेम चार ते पाच महिने उरला आहे. सुनील पोरवाल यांच्याकडील उद्योग खात्यातही बदल केला जाणार नाही. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आशीषकुमार सिंह यांच्याकडे शिक्षण खात्याची जबाबदारी सोपवली जाईल, मनोज सौनिक त्यांची जागा घेतील. प्रवीणसिंह परदेशी यांच्या मदतीला सिडकोचे सध्याचे प्रमुख भूषण गगरानी लवकरच मुख्यमंत्री कार्यालयात येतील असे समजते. अन्य पदांवरील सचिवांनाही लवकरच बददले जाणार आहेत. एमएमआरडीएसाठी आर. ए. राजीव यांची चर्चा आहे.

Web Title: dinesh kumar jain Secretary