दिग्दर्शक विजू माने लिफ्टमध्ये अडकले

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 December 2019

ठाणे : डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी सकाळी मराठी चित्रपट दिग्दर्शक विजू माने हे व्हीआयपी लिफ्टमधून जात असताना लिफ्ट मध्येच बंद पडल्याची घटना घडली. साधारण १५ मिनिटांच्या कालावधीनंतर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. परंतु, त्यांनी या प्रकाराचा संताप थेट फेसबुक शेअर केल्याने घाणेकर नाट्यगृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

ठाणे : डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी सकाळी मराठी चित्रपट दिग्दर्शक विजू माने हे व्हीआयपी लिफ्टमधून जात असताना लिफ्ट मध्येच बंद पडल्याची घटना घडली. साधारण १५ मिनिटांच्या कालावधीनंतर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. परंतु, त्यांनी या प्रकाराचा संताप थेट फेसबुक शेअर केल्याने घाणेकर नाट्यगृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

सोमवारी सकाळी घाणेकर नाट्यगृहात आनंद विश्‍व गुरुकुल शाळेचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विजू माने यांनासुद्धा आमंत्रण होते. दरम्यान, ते सकाळी १० वाजता या ठिकाणी पोहचले असता, सुरक्षा रक्षकाने त्यांना व्हीआयपी लिफ्टमधून नेण्यास सुरवात केली. मात्र, लिफ्ट पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्यामध्ये असतानाच अचानक बंद पडली. अखेर आरडाओरड सुरू झाल्यानंतर इतर सुरक्षा रक्षकांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी माने यांना अक्षरश: बाहेर खेचून काढले. त्यानंतर माने यांनी हा सर्व प्रकार थेट फेसबुकवर शेअर केला. यामध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह आणि दुरवस्था ही युती कधीच तुटणार नाही. आज माझ्यावरचा जीवघेणा प्रसंग टळला, उद्याचं माहीत नाही; अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर टाकली आहे.

महापौरांनी घेतली तातडीने बैठक
घटना घडल्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिकेचे पदाधिकारी व संबंधित अधिकारी यांची महापौर दालनात तातडीची बैठक घेतली. या बैठकीत नाट्यगृहातील लिफ्ट तातडीने कायमस्वरूपी दुरुस्त करणे, नाट्यगृहातील प्रमुख सभागृहासह मिनीथिएटर, पार्किंग या ठिकाणची नियमित साफसफाई राहील यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. साफसफाईसाठी नाट्यगृहात अपुरे कर्मचारी असल्याचे निदर्शनास येत असून या ठिकाणी तातडीने तीन शिफ्टमध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग नेमावा, अशा सूचना या वेळी महापौरांनी दिल्या. 

अधिकाऱ्यांकडून हेतुपुरस्सर दिरंगाई
ठाणे महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी व प्रशासन हे विकासाच्या दृष्टीने अनेक विकासकामे तसेच चांगल्या सुविधा ठाणेकरांना उपलब्ध करून देत असतात, परंतु महापालिकेचे काही अधिकारी हेतुपुरस्सर कामात दिरंगाई करून महापालिकेची नाहक बदनामी करीत आहेत, असा आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी या बैठकीत केला. तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही या वेळी प्रशासनाला दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Director Viju Mane stuck in the elevator