'आई अंकल येईल..'; आणि आईच्या पायाखालची जमीनच सरकली..

'आई अंकल येईल..'; आणि आईच्या पायाखालची जमीनच सरकली..

भिवंडी : पालकांनो तुमचं तुमच्या मुलांवर लक्ष आहे ना ? ते कुठे खेळतात, कुणाशी बोलतात यावर तुमची नजर आहे ना? जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असाल तर ही  चूक तुम्हाला अत्यंत महागात पडेल. देशभरात लैंगिक शोषणाच्या घटना दिवसागणिक वाढताना दिसतायत. दिवसेंदिवस समाजात विकृती कोणत्या थराला जातेय याची या भीषण प्रकारावरून कल्पना येऊ शकते.

ही घटना घडलीये मुबईपासून जवळच असलेल्या भिवंडीमध्ये. त्या दिवशी भिवंडीतील एका उच्चभ्रू सोसायटीत लैंगिक शोषणाचा एक भीषण प्रकार समोर आला. मुलं खेळून घरी आली होती. खेळून आल्यावर आईने त्या मुलाला मळलेले कपडे बदलायला सांगितलेट. हे ऐकताच मुलगा बिथरला आणि म्हणाला 'नको अंकल येईल'. आईने मुलाला विश्वासात घेतलं आणि तो असं का बोलतोय याबद्दल विचारणा केली. मुलाने जे सांगितलं ते ऐकून त्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. 

ही घटना आहे भिवंडीतील आदर्श पार्क मधील आहे. नेहमीप्रमाणे लहान मुलं संध्याकाळी खेळायला गेली होती. तिथे ही लहान मुलं एक कुत्र्यासोबत खेळात होती. मुलं खेळत असताना एक टोपीवाला आपलं विकृत माणूस आपलं गुप्तांग काढून तिथे आला आणि लहान मुलांसोबत त्याने लैंगिक चाळे करायला सुरवात केली. अचानक आलेल्या माणसाला पाहून ही लहान मुलं घाबरली आणि तिथून पळून गेलीत. पण या विकृताची भीती लहान मुलांच्या मनात घर करून होती. संध्याकाळी घरी आल्यावर आईने कपडे बदलायला सांगितल्यावर या मुलानी त्याला नकार दिला. मात्र आईने खोदून विचारल्यावर त्याने आपल्या आईला घडलेला सगळा प्रकार सांगितला. 

हा प्रकार समजताच सोसायटीतील CCTV कॅमेरे तपासले गेलेत आणि मुलं खरं बोलतायत यावर त्या पालकांचा विश्वास बसला. दरम्यान याप्रकरणी पालकांनी तातडीने भिवंडीतील निजामपुरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तडक कारवाई करत या टोपीवालय विकृताचा शोध लावला. हा विकृत नाझराना कंपाउंड इथल्या राधाकृष्ण इमारतीत राहणार आहे. ३६ वर्षीय या भामट्याला पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी CCTV फुटेजची देखील तपासणी केली आणि या विकृतावर ३५४ सह पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल केलाय. 

मुंबईसारख्या शहरात आई वडील दोघे कामावर गेले असतात. अशात लहान मुलं घरी आपल्या आजी आजोबांकडे किंवा प्ले-स्कुलमध्ये असतात. अनेकदा लहान मुलं आणि त्यांच्या पालकांमध्ये संवादच होत नाही. मात्र, हा संवाद झाला पाहिजे. आपल्या लहान मुलांशी बोललं पाहिजे. कुणास ठाऊक त्यांच्यासोबतही असा काही प्रकार होत असेल आणि त्याबद्दल तुम्हाला कल्पनाच नसेल.  

obscene behavior with children in bhiwandi one arrested under pocso act

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com