पत्रीपूलाला दोन वर्षापासून तारीख पे तारीख; कल्याण-डोंबिवलीकरांचा अपेक्षाभंग 

पत्रीपूलाला दोन वर्षापासून तारीख पे तारीख; कल्याण-डोंबिवलीकरांचा अपेक्षाभंग 

कल्याण: कल्याण-शिळफाटा रस्त्यातील रेल्वे मार्गावर असलेला बहुचर्चित 104 वर्षे जुना पत्रीपूल धोकादायक झाल्याने रेल्वे प्रशासनाने 18 नोव्हेंबर 2018 ला मेगाब्लॉक घेऊन तो पाडला. आज या तोडकामाला दोन वर्षे पूर्ण होत असून, दोन वर्षे झाली, तरी अनेकदा "तारीख पे तारीख' पडूनही या पुलाचे बांधकाम आजतागायत पूर्ण न झाल्याने वाहतूक कोंडीत अडकून पडलेल्या कल्याण-डोंबिवलीकरांचा अपेक्षाभंग झाला आहे. 

पत्रीपूल पाडल्यानंतर एक वर्षात नवीन पत्रीपूल उभा असेल, अशा घोषणा सरकारी यंत्रणेने केल्या; मात्र ढिसाळ नियोजनामुळे गेल्या दोन वर्षांपासून या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. हे काम पूर्ण होत नसल्याने कल्याण पूर्व ते पश्‍चिम अशा प्रवासात नागरिकांचा वाहतूक कोंडीने प्रचंड कोंडमारा होत आहे. पत्रीपूल पार करण्यासाठी तासन्‌ तास लागतात. त्यामुळे वाहनचालकांकडून प्रशासनाच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

पत्रीपुलावरील वाहतूक कोंडीने या परिसरात असलेले व्यवसाय बंद पडत असून, अनेक सभागृहांमधील विवाह सोहळ्याच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या. तर रिक्षाचालकही प्रवासी घेऊन जाण्यास कुचराई करत असल्याने पूर्वेकडे राहणाऱ्या नागरिकांची मोठी कोंडी होत आहे. त्यात लॉकडाऊनमुळे पत्रीपुलाच्या कामात खंड पडल्याने नागरिकांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनाकाळात ठप्प पडलेले व्यवहार आता हळूहळू पूर्वपदावर येत असताना प्रशासनाने आता तरी या पुलाच्या कामाचा वेग वाढवावा, अशी मागणी केली जात आहे. 

मार्च 2021 नवी तारीख... 
नवीन वर्षातील मार्च महिन्यात नवीन पत्रीपूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्‍यता सरकारी यंत्रणेकडून व्यक्त होत आहे. रेल्वेमार्गावर पुलाचा सांगडा ठेवण्यासाठी 21, 22, 28, 29 नोव्हेंबरला मध्य रेल्वेने मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या काळात नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सरकारी यंत्रणेचीही तयारी सुरू असून, नवीन वर्षात मार्च 2021 मध्ये हा पूल वाहतुकीला खुला होतो, की "पुन्हा ये रे माझ्या मागल्या' होतंय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Disappointment of Kalyan Dombivalikars regarding Patri bridg

---------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com