सर्वसामान्य मुंबईकरांच्या पदरी निराशाच! Local Trainसाठी आणखी 15 दिवसांची प्रतीक्षा 

समीर सुर्वे
Wednesday, 20 January 2021

मुंबईतील शाळा आणि लोकल सुरू करण्याबाबत पुढील 15 दिवस कोणताही निर्णय होण्याची शक्‍यता नाही. कोरोनाबाबतच्या पुढील 15 दिवसांतील परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारला महापालिका अहवाल देणार आहे.

मुंबई   : मुंबईतील शाळा आणि लोकल सुरू करण्याबाबत पुढील 15 दिवस कोणताही निर्णय होण्याची शक्‍यता नाही. कोरोनाबाबतच्या पुढील 15 दिवसांतील परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारला महापालिका अहवाल देणार आहे. त्यानंतरच लोकल आणि शाळा सुरू करण्याबाबत निर्णय होऊ शकतो, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी सांगितले. 

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वसामान्यांसाठी अद्याप लोकल सुरू केली नसल्याने मुंबईकरांकडून प्रचंड असंतोष व्यक्त केला जात आहे. महामुंबईच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नोकरदारांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे लोकल सेवा सुरू करण्याची मागणी वारंवार केली जात आहे; मात्र पुढील 15 दिवस तरी लोकल सेवा सुरू करण्यासह मुंबईतील शाळांबाबत कोणताही निर्णय होणार नसल्याचे ककाणी यांनी सांगितले. 

 

कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने डिसेंबरअखेरीस ब्रिटनमधून येणारी विमानसेवा बंद होती. आता ती सुरू झाल्याने पुढील 15 दिवसांचा आढावा घेतल्यानंतर राज्य सरकारला अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर लोकल आणि शाळा सुरू करण्याबाबत निर्णय होईल. 
- सुरेश ककाणी,
अतिरिक्त आयुक्त, महापालिका. 

Disappointment for Mumbaikars Wait another 15 days for local train

----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disappointment for Mumbaikars Wait another 15 days for local train