तेजस ठाकरे यांच्याकडून नव्या मत्स्य प्रजातीचा शोध; "चन्ना एरिस्टोनी' असे नामकरण

तेजस वाघमारे
Saturday, 26 December 2020

मेघालयामधून "स्नेकहेड' या मत्स्यप्रजातीमधील नव्या प्रजातीचा शोध संशोधक तेजस ठाकरे आणि जे. प्रवीणराज यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने लावला आहे. "चन्ना' कुळातील या चमकदार आणि आकर्षक रंग असणाऱ्या नव्या मत्स्यप्रजातीचे नामकरण "चन्ना एरिस्टोनी' असे करण्यात आले आहे. 

मुंबई : मेघालयामधून "स्नेकहेड' या मत्स्यप्रजातीमधील नव्या प्रजातीचा शोध संशोधक तेजस ठाकरे आणि जे. प्रवीणराज यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने लावला आहे. "चन्ना' कुळातील या चमकदार आणि आकर्षक रंग असणाऱ्या नव्या मत्स्यप्रजातीचे नामकरण "चन्ना एरिस्टोनी' असे करण्यात आले आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

सापासारखे तोंड असल्यामुळे माशांच्या या प्रजातींना "स्नेकहेड' म्हटले जाते. मेघालयामधील छोट्या डोंगराळ प्रवाहांमध्ये चन्ना एरिस्टोनी या नव्या "स्नेकहेड' प्रजातीचा अधिवास आहे. निळ्या-हिरव्या रंगांचे हे चमकदार मासे असून त्यांच्या शरीरावर तपकिरी-लाल रंगाचे गोलाकार ठिपके आहेत. संशोधक तेजस ठाकरे, प्रवीणराज, अरुमुगम उमा, एन. मौलीथरन, गजेंद्र सिंह, बंकित के. मुखिम यांनी या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. 
मेघालयातील मत्स्यप्रेमी एरिस्टोन एम. रेंडॉन्ग्संगी यांना 2019 मध्ये "चन्ना एरिस्टो' ही नवी प्रजात आढळून आली होती. या प्रजातीचे छायाचित्र आम्हाला मिळाल्यानंतर त्यामध्ये नावीन्य असल्याचे लक्षात आले. त्यानंतर हे नावीन्य लक्षात घेण्यासाठी, त्यांचे फोटो घेण्यासाठी तसेच प्रजातीचे नमुने गोळ्या करण्यासाठी थेट मेघालयात गेलो. त्यांतर हाडांचे निरीक्षण आणि गुणसूत्रांच्या (डीएनए) आधारे निरीक्षण केल्यानंतर ही प्रजात "चन्ना' कुळात नवीन असल्याचे आमच्या लक्षात आले, असे संशोधक जे. प्रवीणराज यांनी सांगितले. तसेच, इतर माशांप्रमाणे हा मासादेखील लहान कीटक आणि किड्यांवर जगत असल्याचे त्यांनी सांगितले. 

घरी बसलेल्या महाराष्ट्राच्या वाघाला घरच्यांनीही मरतुकडा म्हणावं हे...! भातखळकर यांच्याकडून राऊतांची खिल्ली 

...म्हणून "चन्ना एरिस्टोनी' नाव 
मत्स्यप्रेमी एरिस्टोन एम. रेंडॉन्ग्संगी यांनी या प्रजातीला आमच्या निदर्शनास आणून दिल्याने तिचे नामकरण त्यांचा नावाने "चन्ना एरिस्टोनी' असे केले आहे. अमेरिकेच्या "अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथोलॉजिस्ट' आणि "कोपिया' या नियतकालिकांमध्ये या शोधाची माहिती प्रसिद्ध झाल्याचे संशोधक जे. प्रवीणराज यांनी सांगितले.

Discovery of new fish species by Tejas Thackeray Named Channa Aristoni

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discovery of new fish species by Tejas Thackeray Named Channa Aristoni