
मुंबई - शहरातील शक्तीसागर ही इमारत 1992 पासून उभी आहे. ही इमारत बेकायदा नाही. 2018-19 मध्ये मी ही इमारत घेतली असून त्याबाबतचे अधिकृत कागदपत्रे माझ्याकडे आहेत. इमारतीतील एक खिडकीसुद्धा 1992 पासून तोडण्यात आलेली नाही. असे अभिनेता सोनू सूद याने मुंबई उच्च न्यायालयात म्हटले आहे.
जुहू येथे असलेल्या शक्तिसागर या निवासी इमारतीचे निवासी हॉटेलमध्ये रुपांतरीत करण्यासाठी मुंबई महापालिकेची आवश्यक ती परवानगी न घेताच बदल करण्यात आले आहेत. असे मुंबई महानगर पालिकेने उच्च न्यायालयात आपल्या प्रतिज्ञापत्राद्वारे म्हटले आहे.याबाबची सुनावणी न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर सुरू होती.
मुंबई महानगर पालिकेच्या एमआरटीपी कायद्याच्या कलम 53 अन्वये नोटीस बजावताना कथित अनधिकृत बांधकामाचा कोणताच तपशील दिला नाही. अगदी उथळ स्वरुपाची नोटीस दिली. तरीही मी माझ्याकडे उपलब्ध सर्व कागदपत्रांच्या आधारे उत्तर दिले. तरीही पालिकेने माझ्या बाबतीत भेदभाव केला असल्याचे सोनू सूदने न्यायालयात म्हटले आहे.
Discrimination against me by Mumbai Municipal Corporation Actor Sonu Sood sues in High Court
---------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.