गारंबी रस्त्यावरील मोरीचे काम रखडले   स्थानिकां सह पर्यटकांची नाराजी

गारंबी रस्त्यावरील मोरीचे काम रखडले स्थानिकां सह पर्यटकांची नाराजी

गारंबी रस्त्यावरील मोरीचे काम रखडले
स्थानिकांसह पर्यटकांची नाराजी

मुरूड, ता. १० (बातमीदार) ः पावसाळ्यापूर्वी मुरूड-रोहा मार्गावरील गारंबी रस्त्यावर मोरीचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र हे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. रविवारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्‍या, त्‍यामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती. मोरीचे काम न झाल्‍याने अतिवृष्‍टीत वर्दळीचा मार्ग होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.
मुरूड-रोहा या मुख्य रस्त्यावर मोरीवर छोटा पूल उभारण्याचे काम फेब्रुवारीत सुरू करण्यात आले होते. पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी रस्‍त्‍यालगत काँक्रिटचे काम अपूर्ण राहिल्याने स्थानिकांसह पर्यटकांना वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मुरूड-गारंबीमार्गे रोहा हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा व खुष्कीचा मार्ग आहे. त्‍यामुळे प्रवासातील वेळ आणि अंतर कमी होत असून इंधनाचीही बचत होते. हिरवाईने नटलेल्या रस्त्यावरून रोज शेकडो वाहनांची वर्दळ सुरू असते. अनेक दिवसांपासून रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्‍याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
हा रस्ता जागोजागी खड्डेमय झाल्याने चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हा रस्ता नागशेत, गारंबी, पारगाण, धनगरवाडी, गोपाळवटपर्यंत खराब झाला आहे. गतपावसाळ्यात मुरूड-केळघरमार्गे रोहा हा रस्ता खचला होता, त्या वेळी एसटी वाहतूक बंद करण्यात आल्‍याने प्रवाशांचीही गैरसोय होत आहे.

रस्‍त्‍यावर पाणी आल्‍यास वाहतूक ठप्प
सध्या शीघ्रे गावातील मोरी व गारंबी येथील मोऱ्यांचे कामे अपूर्ण असल्याने वाहतूक कच्च्या रस्त्यावरून सुरू आहे. परंतु अतिवृष्‍टीत डोंगर उतारावरील पाण्याचा प्रवाह वाढल्यास रस्त्यावर पाणी येते आणि वाहतूक बंद होते. त्‍यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर मोऱ्यांची कामे पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मुरूड ः गारंबी रस्‍त्‍याचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com