मोदींच्या वक्तव्याचे डोंबिवलीत पडसाद; काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमने सामने

congress-bjp dispute
congress-bjp disputesakal media

डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात बुधवारी डोंबिवली (Dombivali) शहर ब्लॉग कॉंग्रेस कमिटीच्यावतीने (congress committee) भाजपा कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच भाजपा कार्यकर्तेही (bjp) कार्यालयासमोर जमा झाले. समोरासमोर येताच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी (Dispute between bjp and congress) करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

congress-bjp dispute
नवी मुंबई: पोलिसांवर चप्पल भिरकावली; तीन महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये केलेल्या भाषणात कॉंग्रेस पक्षावर शाब्दिक हल्ला चढवला. या वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसतर्फे भाजपा कार्यालयाबाहेर निषेध आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार डोंबिवली शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कल्याण डोंबिवली शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष सचिन पोटे व कार्याध्यक्ष जितेंद्र भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिमेतील सम्राट चौकात भाजपा कार्यालयासमोर बुधवारी मोदी सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेने कोरोना पसरविल्याचा खोटा नाटा आरोप केला आहे. हे बोलून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे. गुजरात हा नेहमीच महाराष्ट्राच्या विरोधात राहीला आहे. यामुळे आज काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आल्याचे कमिटी अध्यक्ष पोटे यांनी सांगितले. कॉंग्रेसच्या आंदोलनाची माहिती मिळताच भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते कार्यालय परिसरात दाखल झाले.

congress-bjp dispute
खारघरमध्ये मालमत्ताकराची होळी; प्रशासनाविरोधात लढा उभारणार

मोदी सरकार विरोधात कॉंग्रेसकडून घोषणाबाजी केली जात असतानाच भाजपा कार्यकर्त्यांनी दुसरीकडून वंदे मातरम बोलत घोषणाबाजीला सुरुवात केली. दोन्ही पक्षाकडून जोरदार घोषणाबाजीस सुरुवात झाल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तसेच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचीही समजूत काढत वातावरण शांत केले.

भाजपाचे वरातीमागून घोडे

भाजपाची भूमिका म्हणजे वरातीमागून घोडे, त्यांची हिम्मत नाही आमच्या समोर यायची. जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत पोलिस स्टेशनला नेत होते, त्यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणा केल्याचे यावेळी कमिटी अध्यक्ष पोटे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com