डोंबिवली - दिवा येथील एका खासगी शाळेत 10 वर्षीय विद्यार्थिनीचा शाळेतल्या वर्गात विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. बाहेरून आलेल्या एका व्यक्तीने विद्यार्थिनी समोर अश्लील प्रकार करून तिचा विनयभंग केला आहे..विनयभंग करणाऱ्या नराधमाच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे विद्यार्थीनी शाळेत देखील सुरक्षित नसल्याची बाब यामुळे अधोरेखित होत आहे..मुंब्रा देवी रोड परिसरात पीडित मुलगी आपल्या कुटुंबासह राहते. दिव्यातील एका खासगी शाळेत 5 वी मध्ये ती शिक्षण घेते. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे पीडित मुलीच्या वडिलांनी मुलीला सकाळी 7 ला शाळेच्या गेटवर सोडले. मुलगी वर्गात गेली असता वर्गात जास्त कोणी मूल आली नव्हती..याचाच फायदा घेत एका नराधमाने तिच्या पाठी तिच्या वर्गात जाऊन तिच्या समोर अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा करताच सदर व्यक्ती तेथून निघून गेली. मुलीने घडलेला प्रकार शाळेतील शिक्षकांना सांगितला. शिक्षकांनी देखील शाळेच्या आवारात पाहणी केली मात्र तेवढ्यात ती व्यक्ती तेथून पळून गेली..पीडित मुलीने घरी पालकांना हा प्रकार सांगताच मुलीच्या पालकांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून विनयभंग करणाऱ्या नराधमावर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.