दिवा-आगासन रोडवर भरदिवसा तरुणाला ट्रकने चिरडले; तरुणाचा जागीच मृत्यू

Accident
Accidentsakal media

डोंबिवली : दिवा-आगासन रोडवर (Diva-Agasan Road) भरदिवसा एका तरुणास ट्रकने चिरडल्याची घटना (Truck Accident) घडली आहे. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू (Teenager death) झाला आहे. अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये (Accident cctv footage) कैद झाली आहे. दिवा आगासन रोडवर मंगळवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात मृत्यू पावलेला तरुण हा नातेवाईकांकडे लग्नकार्य असल्याने दिव्यात आला होता.

मंगळवारी दुपारी दुचाकी वरून ते प्रवास करत होते. सोसायटी खाली दुचाकी पार्क करण्यासाठी त्यांनी रस्त्याच्या कडेला दुचाकी नेली. याचदरम्यान भरधाव आलेल्या एका ट्रकने त्यांना धडक दिली. यात मयूर धनसाई (Mayur dhansai) याला ट्रकने उडविले, यात त्याचा मृत्यू झाला असे स्थानिकांनी सांगितले. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

याबाबत दिव्यातील सामाजिक कार्यकर्ते अमोल केंद्रे यांनी अपघातास प्रशासनास जबाबदार ठरवले आहे. दिवा-आगमन रोडचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. रस्ते दोन्ही बाजूने खोदल3 गेले आहेत. त्यात रस्त्याच्या कडेला वाहने उभी केलेली असतात. उभी केलेली वाहने, फेरीवाले यामुळे या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्याचं काम पूर्ण करावे अशी मागणी त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com