Special Report | कृषी परंपरेची दिवाळी लुप्त होतेय; अनेक प्रथांवर स्थलांतर, यांत्रिकीकरणाची गदा 

Special Report | कृषी परंपरेची दिवाळी लुप्त होतेय; अनेक प्रथांवर स्थलांतर, यांत्रिकीकरणाची गदा 

विक्रमगड : आधुनिक म्हटल्या जाणाऱ्या यांत्रिक युगामुळे पूर्वापार चालत आलेली अस्सल कृषी परंपरेची दिवाळी हळूहळू लुप्त होत आहे. शेतीच्या मळणी, नांगरणी, खुरपणी अशा अनेक कामांमध्ये आता ट्रॅक्‍टर व इतर यंत्रांचा वापर होत आहे. त्यामुळे गुरे, ढोरे कमी होत आहेत. त्यात रोजगारासाठी अनेकांनी शेतीची कास सोडून शहराची वाट धरल्याने पडीक जमिनींमध्ये वाढ होत आहे. परिणामी पूर्वी आपल्या सर्जा-राजासोबत माळरानावर गर्दी करून एकत्रित दिवाळीचा आनंद लुटणाऱ्या बळीराजाचे चित्र यंदा खेड्यात फारसे पाहायला मिळाले नाही, अशी खंत जाणकार मंडळींनी व्यक्त केली. 

पूर्वी उत्साहाने ही परंपरा जगलेल्या विक्रमगड तालुक्‍यातील शेतकरी व ज्येष्ठ नागरिकांनी याबाबत माहिती दिली. दीपावली, बलिप्रतिपदा व पाडवा या दिवशी ग्रामीण भागात शेतकरी सकाळीच आपल्या गोठ्यातील गाय, बैल, म्हैस यांना स्वच्छ धुऊन, रंगाने व फुग्यांनी त्यांना सजवतात. नंतर गावाच्या वेशीवर (चौकात) पेंढा किंवा गवत पेटवून त्यावरून गुरांना उडविले जाते. यादिवशी जनावरांना अग्नीवरून उडविल्यास त्यांना वर्ष भरात कोणतेही आजार होत नाहीत, अशी यामागे भावना आहे. 

दिवाळीच्या दिवशी म्हशीचे रेडे, बैल किंवा बोकड यांच्या झुंजीदेखील लावल्या जातात. त्या बघण्यासाठी अख्खे गाव माळरानावर गर्दी करते. त्यानंतर समूहाने प्रत्येकाच्या घरी जाऊन फराळाचा आस्वाद गावाकडची मंडळी घेतात. हा दिवस अख्खे गाव एकमेकांचा पाहुणचार करण्यात घालवते; मात्र आता जगण्याच्या धावपळीत व यांत्रिकीरणाच्या रेट्यामुळे या परंपरा काळाच्या पडद्याआड जात असल्याची खंत ज्येष्ठांनी व्यक्त केली. 

Diwali of agricultural tradition is disappearing Migration on many practices, the hammer of mechanization

------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com