
हजारो कोटींच्या येस बॅंक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी कपिल आणि धीरज वाधवा यांचा जामीन अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केला. यामुळे वाधवा बंधूंची दिवाळी आता कोठडीत जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.
मुंबई : हजारो कोटींच्या येस बॅंक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी कपिल आणि धीरज वाधवा यांचा जामीन अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केला. यामुळे वाधवा बंधूंची दिवाळी आता कोठडीत जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.
दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचे प्रवर्तक असलेल्या कपिल आणि धीरज यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्या. सारंग कोतवाल यांनी बुधवारी (ता. 4) यावर निकाल जाहीर केला. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात वाधवा बंधूंना जामीन मंजूर झाला आहे; मात्र सीबीआयच्या प्रकरणात जामीन नामंजूर करण्यात आला. गॅंगस्टर इक्बाल मिर्चीच्या मालमत्ता खरेदी प्रकरणातही वाधवा बंधूंवर ईडीने गुन्हा नोंदविला आहे.
येस बॅंक प्रकरणात आरोपपत्र दाखल करताना तपास यंत्रणेने नियमांची पूर्तता केली नाही. तपास पूर्ण झाल्यावर न्यायालयाने आरोपपत्राची दखल घ्यायला हवी होती. तसेच कागदपत्रे वेळेत दाखल केली नाही, असा दावा ऍड. अमित देसाई यांनी वाधवा यांच्या वतीने केला होता. मात्र कोरोना संसर्गामध्ये सुरक्षा तत्त्वे पाळून कागदपत्रे दाखल केली. असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी सांगितले होते. डीएचएफएलने येस बॅंकेत सुमारे 3700 कोटी रुपयांचे अल्पमुदतीचे रोखे ठेवले होते. यासाठी सुमारे 600 कोटी रुपयांचे कर्ज वाधवान यांच्या निकटवर्तीयांना दिल्याचा आरोप अभियोग पक्षाने केला आहे.
--------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)