esakal | मुंबई नववर्षाच्या स्वागताला फटाके फोडण्यास बंदी? क्लब, पबवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई नववर्षाच्या स्वागताला फटाके फोडण्यास बंदी? क्लब, पबवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक

दिवाळी प्रमाणेच नववर्षाच्या स्वागताला फटाके फोडण्यावर बंदी येण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर नाईट क्लब आणि पबवर लक्ष ठेवण्यासाठी महानगर पालिकेने प्रत्येक प्रभाग स्तरावर पथके तयार केली आहेत.

मुंबई नववर्षाच्या स्वागताला फटाके फोडण्यास बंदी? क्लब, पबवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई :  दिवाळी प्रमाणेच नववर्षाच्या स्वागताला फटाके फोडण्यावर बंदी येण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर नाईट क्लब आणि पबवर लक्ष ठेवण्यासाठी महानगर पालिकेने प्रत्येक प्रभाग स्तरावर पथके तयार केली आहेत. वेळ पडल्यास नियमबाह्य पध्दतीने सुरु असलेल्या क्लब आणि पबवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचीही मदत घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

मुंबईतील विलेपार्ले पोलिस ठाण्याला सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत पुरस्कार

दिवाळीत फक्त लक्ष्मी पुजनाला खासगी संकुलांमध्ये बिना आवाजाचे फुलबाजा,पाऊस असे शोभेची राेषणाई करण्याची परवानगी महानगर पालिकेने दिली होती. तर, नव वर्षाच्या स्वागताला मुंबईत मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. मात्र, यंदा त्यावर बंदी येण्याची शक्यता आहे. ‘नव वर्षाच्या स्वागताला फटाके फोडण्याबाबात योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल’,असे अतिरीक्त आयुक्त सुरेश ककानी यांनी सांगितले.

महापालिकेने मागील आठवड्यात वांद्रे आणि लोअर परळ येथील क्लबवर रात्री धाड टाकली होती. या धाडीत सर्व नियमांचे उल्लंघन करुन तेथे प्रचंड मोठी गर्दी असल्याचे आढळले. महापालिकेने या क्लब विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याच बरोबर आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्व प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांना नाईट क्लब आणि पबवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई परिसरातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

लॉकडाऊन मध्ये शिथीलता देताना सर्वांसाठी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार व्यवसाय करणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन होत आहे का नाही हे तपासण्यासाठी प्रत्येक प्रभागात दाेन पथक तयार केली आहे. यात, आरोग्य विभाग, अग्निशमन दल, सुरक्षा रक्षक विभागाचे प्रत्येक एक  कर्मचारी आणि अधिकाऱ्याचा सहभाग आहे.क्लब आणि पबवरही लक्ष ठेवणार आहे.तसेच वेळ पडल्यास पोलिसांचीही मदत घेतली जाईल असेही ककानी यांनी सांगितले.

Like Diwali New Years 2021 Event is likely to see a ban on fireworks.

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )