esakal | अनलॉकमध्येही दादरमध्ये दिवाळीची खरेदी तेजीत
sakal

बोलून बातमी शोधा

अनलॉकमध्येही दादरमध्ये दिवाळीची खरेदी तेजीत

दिवाळीच्या सणांकरिता खरेदीसाठी नागरिकांनी दादारमध्ये गर्दी केली आहे. त्यामुळे खरेदी तेजीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

अनलॉकमध्येही दादरमध्ये दिवाळीची खरेदी तेजीत

sakal_logo
By
रजनीकांत साळवी

मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी साधेपणात साजरी करण्याचे आव्हान सरकारच्या वतीने करण्यात आले असले तरी दिवाळीच्या सणांकरिता खरेदीसाठी नागरिकांनी दादारमध्ये गर्दी केली आहे. त्यामुळे खरेदी तेजीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

मुंबईतील दादर हे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जाते. वर्षाचे बाराही महीने दादरमध्ये खरेदीसाठी लोकांची वर्दळ दिसून येते.  सर्वसामान्य लोकांसाठी लोकल सेवा अजूनही सुरू केली नसली तरीदेखील दादरमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.

सोशल डिस्टंन्सचे सर्व नियम पाळून तोंडाला मास्क वापरुन तसेच वेळोवेळी सॅनिटायजरचा वापर करूनच खरेदी करत असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.  दिवाळी ऐन तोंडावर आलेली असताना दादरमधील दुकाने देखील बहरली असून फराळची दुकाने, विविध आकाश कंदील, पणत्या, आकर्षक एलईडी बलबचे तोरणे, सजावटीसाठी लागणारी कृत्रिम फुले, दरवाजात लागणारी स्टीकर्स यांनी दुकाने सजली आहेत. फूल बाजार, मिठाईची दुकाने, सुका मेवा फरळांची दुकाने व कपड्यांच्या दुकानात खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.

अधिक वाचा-  मुंबईतल्या कापड बाजाराची मंदीशी झुंज, दिवाळीच्या तोंडावर बाजार सावरतोय

कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून व्यवसायिकांना नुकसानीची झळ बसली मात्र आता हळूहळू दुकाने सुरू झाल्यामुळे नियम पाळतच व्यवसाय करत असल्याची प्रतिक्रिया दुकानदारांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या खरेदीसाठी दादरमधील संभाव्य गर्दी लक्षात घेता पोलिसांनी खबरदारी घेतली असून काही मार्ग बंद करण्यात आलेत.

  • दिवाळी सण असाच वाया जाऊ नये याकरिता थोडी का होईना मात्र घरी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी सोशल डिस्टनसचे नियम पाळूनच आम्ही केली.

सिद्धेश राणे (ग्राहक)

  • दिवाळी निमित्त आम्ही दरवर्षी दादरला खरेदीसाठी येतो यावर्षी कोरोंनाची खबरदारी घेत गर्दीत न जाता आवश्यक असणारी खरेदी थोडक्यातच आटोपली.

विशाल राजेसावंत (ग्राहक)

  • यंदा दिवाळी खरेदीसाठी लोकांची गर्दी असली तरी दरवर्षी प्रमाणे तेवढी विक्री झालेली नाही कोरोंनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आम्ही ग्राहकाना सोशल डिस्टनस पाळण्याचे आव्हान करीत आहोत तर ग्राहक देखील डोक्यापासून तोंडापर्यंत मास्कने झाकून खबरदारी घेत आहेत.

अश्विनी श्रीयान (स्वामी समर्थ गृहउद्योग)

  • मी दररोज सकाळी ९ वाजता धारावी येथून दादरला पणती विकण्यासाठी येते कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी काळजी घेऊन पोटासाठी कायतरी करावेच लागते.

गऊबाई कुंजीर (पणती विक्रेते)

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Diwali shopping booms in Dadar in Unlock Corona update

loading image