

Traffic Jam
esakal
Mumbai: दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबई आणि उपनगरांतील नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने मुंबईतून बाहेर पडणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडींचा सामना करावा लागतो आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनांच्या ५ ते ६ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या असून, मुंबई-गोवा महामार्ग आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरही वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे कोकणासह पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.