

gajendra chouhan
esakal
महाभारत या लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिकेत युधिष्ठिराच्या भूमिकेने ओळख मिळवलेले ज्येष्ठ अभिनेते गजेंद्र चौहान यांना फेसबुकवर फिरणाऱ्या बनावट जाहिरातीचा फटका बसला. डी-मार्टच्या नावाने तयार केलेल्या या खोट्या जाहिरातीने त्यांना ऑनलाइन खरेदी करण्यास प्रवृत्त केले. खरेदी प्रक्रियेदरम्यान आलेला एक ओटीपी त्यांनी टाकताच त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून थेट ९८ हजार रुपये गेले. ही फसवणूक झाल्याचे समजताच गजेंद्र चौहान यांनी विलंब न लावता ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.