Mumbai High Court: बलात्कार पीडितेच्या मुलाची डीएनए चाचणी करणे अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचे मत

Mumbai High Court : पीडितेला जन्मलेल्या बाळाची डीएनए चाचणीबाबत माहिती विचारली होती
Mumbai High Court
Mumbai High CourtSakal

Mumbai High Court : बलात्कार पिडीत महिलेचे मुल इतर कोणी दत्तक घेतल्यानंतर बलात्कार पीडित महीलेच्या मुलाची डीएनए चाचणी करणे मुलाच्या हिताचे नसल्याचे मत. मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

Mumbai High Court
Mumbai High Court : 'वेडी आहेस' म्हणणं अपमान नाही, हायकोर्टाची टिप्पणी; घटस्फोट प्रकरणात पत्नीला दिली समज

न्यायमूर्ती जी ए सानप यांच्या एकल खंडपीठाने 10 नोव्हेंबर रोजी एका 17 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला गर्भधारणा केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला जामीन मंजूर केला. या संदर्भात याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायलयाने मत मांडले आहे.

या प्रकरणात पिडीत मुलीने बाळाला जन्म दिला. कालांतराने मुलाला दत्तक देण्यात आले. उच्च न्यायालयाने यापूर्वी केलेल्या सुनावणीत पोलिसांकडून पीडितेला जन्मलेल्या बाळाची डीएनए चाचणीबाबत माहिती विचारली होती

Mumbai High Court
Mumbai News : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

यावर पीडिते महीलेने जन्म दिल्यानंतर मुलाला दत्तक घेण्यासाठी ठेवल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. मूल आधीच दत्तक दिले असून संबंधित संस्था दत्तक पालकांची ओळख उघड करत नसल्याची माहिती न्यायालयात दिली.मूल दत्तक घेतल्यापासून वास्तविक परिस्थितीत, मुलाची डीएनए चाचणी मुलाच्या आणि मुलाच्या भविष्याच्या हिताची असू शकत नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

या प्रकरणी आरोपीने आपल्या जामीन अर्जात दावा केला होता की गुन्हा घडला तेव्हा पीडित 17 वर्षांची असली तरी त्यांचे नाते सहमतीने होते. तसेच या संदर्भात मुलीला तिला याची समज होती. आरोपीने पीडितेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिला गर्भधारणा केल्याचा पीडितेचा आरोप होता.

Mumbai High Court
Mumbai High Court: मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची देवेंद्र उपाध्याय यांनी घेतली शपथ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com