

cultivation
ठाणे - ठाणे जिल्ह्यामध्ये यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे शेतकरी बांधवांना खरीप पेरणी करण्यास विलंब होत आहे. या पार्श्वभूमीवर, जोपर्यंत जिल्ह्यात किमान १०० मिलिमीटर पाऊस होत नाही, तोपर्यंत शेतकरी बांधवांनी पिकांची पेरणी करू नये, असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.