'सार्वजनिक शौचालयांचे निर्जंतुकीकरण करा'; मुंबई महापालिका आयुक्तांचे आदेश..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

मालाड येथे वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज मालाड भागात दौरा केला. यावेळी त्यांनी सार्वजनिक शौचालयांचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यांनी स्थानिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. 

मुंबई : मालाड येथे वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज मालाड भागात दौरा केला. यावेळी त्यांनी सार्वजनिक शौचालयांचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यांनी स्थानिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. 

 मालाड (पूर्व) परिसरातील आप्‍पापाडा, संत्री कंपाऊंड, प्रथमेश नगर, देवकी नगर, शिवशाही रहिवासी संघ, महेश्‍वर नगर आदी प्रतिबंधित भागात पालिका आयुक्तांनी दौरा केला.  मालाड पूर्व परिसरात कोरोना संसर्ग झपाट्याने पसरतो आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी दौरा करून तेथील अडचणी समजून घेतल्या. 

 हेही वाचा: माता कोरोना पॉझिटिव्ह बाळ मात्र निगेटीव्ह; सायन रूग्णालयात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोरोना निगेटिव्ह बाळांचा जन्म.. 

या भागात महापालिकेतर्फे पुरविण्‍यात येत असलेल्‍या नाग‍री सेवा-सुविधांची पाहणी केली. यावेळी उपायुक्‍त रणजित ढाकणे,  सहाय्यक आयुक्‍त संजोग कबरे आदी अधिकारी उपस्थित होते.

मालाडमध्ये कोरोना बाधित ३ हजार २६७ रुग्‍ण आतापर्यंत आढळले असून त्‍यापैकी १ हजार ४४२ रुग्‍ण बरे होऊन घरी गेले आहेत. या पाहणी दौऱ्यादरम्यान महापालिका आयुक्तांनी परिसरातील विविध सार्वजनिक शौचालयांना भेटी देऊन तेथील स्वच्छतेची पाहणी करुन तेथील परिस्थिती जाणून घेतली. तसेच या सार्वजनिक शौचालयांमध्ये नियमितपणे दिवसातून ५ ते ६ वेळा ‘सॅनिटायझेशन’ करण्याच्या सूचनाही त्यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

हेही वाचा: भाजप आमदार आशिष शेलारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; विचारला 'हा' महत्वाचा प्रश्न.. 

 नागरिकांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती करुन घेण्‍यासाठी पायी पाहणी दौरे उपयुक्‍त ठरतात. त्‍याचबरोबर भविष्‍यातील नियोजनाच्‍या दृष्‍टीने नागरिकांच्‍या गरजा व महापालिकेकडून असलेल्‍या अपेक्षा समजावून घेण्‍यास या पाहणी दौऱ्याचा निश्चितच उपयोग होतो, असेही आयुक्तांनी यावेळी  स्पष्ट केले.

do sanitization of public toilets bmc commissioner orders


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: do sanitization of public toilets bmc commissioner orders