
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ आज मुंबई दौऱ्यावर आहेत. सकाळी 9ः15 च्या सुमारास त्यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला भेट दिली.
मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ आज मुंबई दौऱ्यावर आहेत. सकाळी 9ः15 च्या सुमारास त्यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला भेट दिली. मुंबईतील चित्रपट उद्योगाच्या धर्तीवर उत्तरप्रदेशात चित्रपट उद्योग उभा राहावा असे त्यांनी म्हटले होते. ते या दौऱ्यात चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनाही भेटणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे.
हेही वाचा - कॅबचालकांच्या मनमानीला चाप! केंद्र सरकारची नवीन नियमावली
योगी अदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर शिवसेनेने टीका केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, 'भाजपनेते मुंबईची फिल्मसिटी हलवण्याचा घाट घालत आहेत. या आधीसुद्धा ग्रेटर नोयडामध्ये फिल्मसिटी उभारण्यात आली आहे. त्याठिकाणी काय काम सुरू आहे. याचीही माहिती लोकांसमोर ठेवावी. योगी अदित्यनाथ यांना त्यांच्या राज्यात फिल्म सिटी उभारायची असेल तर स्वागत आहे. परंतु म्हणून ते तामिळनाडू, पश्चिम बंगाल किंवा इतर ठिकाणच्याही फिल्मसिटीला भेट देणार आहेत का? की फक्त तुम्हाला मुंबईशी पंगा घ्यायचाय? योगीजी आमचे मित्र आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत फिल्मसिटी उभारावी आणि ती चालवून दाखवावी. आमच्याकडेचे जलसा, प्रतिक्षा इत्यादी बंगलेसुद्धा उत्तरेत हलवणार आहेत का? मुंबईची फिल्मसिटी हलवणं गंमत आहे का? या फिल्मसिटी साठी आम्ही घाम गाळलाय'. अशी प्रतिक्रीया संजय राऊत यांनी दिली.
Do you want to quarrel with Mumbai? sanjay raut
---------------------------------------------------------