Doctors Perform Complex Surgery to Remove Fish Bone Lodged
sakal
विरार - वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथे डॉक्टरांनी अत्यंत दुर्मीळ आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया करून ११ वर्षीय मुलीच्या थायरॉईड ग्रंथीत अडकलेला मासळीचा काटा यशस्वीपणे काढला. ही शस्त्रक्रिया वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथील वरिष्ठ ईएनटी तज्ज्ञ आणि हेड अँड नेक ऑनकोसर्जन डॉ. चंद्र वीर सिंह यांच्या नेतृत्वाखाली डॉ. शीतल राडिया आणि त्यांच्या टीमने केली.