
Dombivali Latest News: कल्याण, डोंबिवली शहर नशामुक्त करण्याचे अभियान कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सुरू केली आहे. या अभियानांतर्गत मागील दोन दिवसात विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाने डोंबिवली शहराच्या विविध भागात कारवाई करून तीन गांजा तस्करांना अटक केली. त्यांच्याकडून 6 लाख रूपये किमतीचा 30 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.