डोंबिवली : अमेरिकन डॉलरच्या नावाखाली कोरे कागद देणाऱ्या गुन्हेगारांना अटक

Dombivali crime
Dombivali crimesakal media
Updated on

डोंबिवली : कमी पैशात जास्त अमेरिकन डॉलर (American dollar) देतो असे भासवून नागरिकांकडून लाखो रुपये उकळून (money scam) त्यांना अमेरिकन डॉलरच्या नावाखाली कोरे कागद (blank document) देणाऱ्या दोघा चोरट्यांना (two thief arrested) मानपाडा पोलीसांनी (Manpada police) अटक केली आहे. मोहीन अहमद (वय 31) व रफीक शेख (वय 25) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

Dombivali crime
राज्यात चिकनगुनिया वाढतोय; पाच वर्षातील सर्वाधिक रुग्णांची नोंद

कासा रिव्हो पलावा परिसरात राहणाऱ्या एका 43 वर्षीय व्यक्तीला कमी पैशात अमेरिकन डॉलर देतो असे सांगून फसवणूक झाल्याची घटना मंगळवारी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणाचा शोध घेत असतानाच मानपाडा पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले होते. त्याच्या आधारे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भिसे, पोलीस हवालदार सुधीर कदम, भानुदास काटकर, पोलीस नाईक संजू मासाळ, अनिल घुगे, पोलीस शिपाई ताराचंद सोनवणे यांच्या पथकाने तपास करीत नांदीवली परिसरात राहणाऱ्या मोहीन व रफीक यांना अटक केली.

त्यांच्याकडून 58 हजार रुपये रोख रक्कम व 12 अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जे.डी. मोरे यांनी सांगितले. हे दोघे नागरिकांना 3 लाखात 10 लाख रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर देतो असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेत असत. त्यानंतर त्यांना अमेरिकन डॉलर असलेल्या नोटांची बॅग देत असत. मात्र त्यामध्ये एक, दोन नोटा व कोऱ्या कागदाचा बंडल देत असे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com