डोंबिवली : 1 किलो 171 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त; एकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

culprit arrested

डोंबिवली : 1 किलो 171 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त; एकाला अटक

डोंबिवली : नेवाळी येथे गांजा विक्री (Hashish selling) करणाऱ्या मुकेश भोपी (Mukesh bhopi) (वय 25) याला मानपाडा पोलिसांनी (Manpada police) अटक (culprit arrested) केली आहे. 75 हजार 800 रुपये किंमतीचा 1 किलो 171 ग्रॅम वजनाचा गांजा त्याच्याकडून जप्त करण्यात आला (hashish seized) आहे. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा व अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याने पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे (shekhar Bagade) यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागास तशा सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा: सरकारचे आमदार पडळकरांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रण

निळजे गावात गांजा विक्रीस एक तरुण येणार असल्याची माहिती बागडे याना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भिसे व त्यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला.दुचाकीवरून जाणाऱ्या मुकेश याच्या हालचाली संशयास्पद आढळुन आल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ गांजा आढळून आला. त्याला अटक करत पोलिसांनी गांजा, मोटारसायकल व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे.

loading image
go to top