Dombivali News : केडीएमसी हद्दीत बीएमसीची झाकणे?

केडीएमसी हद्दीत अनेक ठिकाणी गटारांवर केडीएमसीची नाही तर बीएमसीची झाकणे बसविण्यात आली आहेत.
BMC Chamber Covers
BMC Chamber Coverssakal
Summary

केडीएमसी हद्दीत अनेक ठिकाणी गटारांवर केडीएमसीची नाही तर बीएमसीची झाकणे बसविण्यात आली आहेत.

डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत एमएमआरडीएच्या वतीने रस्त्यांची सिमेंट कॉंक्रीटीकरणची कामे सुरु आहेत. रस्त्यांच्या कामांआधी भूमिगत गटारांची कामे देखील करण्यात आली आहेत. केडीएमसी हद्दीत अनेक ठिकाणी गटारांवर केडीएमसीची नाही तर बीएमसीची झाकणे बसविण्यात आली आहेत. ही बाब कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देताच ही झाकणे बदलण्यात आली आहेत. केडीएमसी क्षेत्रात बीएमसीची झाकणे येतातच कशी अशा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

कल्याण डोंबिवली परिसरात पालिका प्रशासन, एमएमआरडीए, एमएसआरडीसी यांच्या वतीने रस्त्यांची सीमेंट कॉंक्रीटीकरणची कामे सुरु आहेत. रस्त्यांच्या कामासोबतच रस्त्याच्या दुतर्फा गटारे बांधण्यात येत असून या गटारांवर बीएमसीचा शिक्का असलेली झाकणे बसविण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी गटारांवर अशी झाकणे दिसून येतात. डोंबिवली पूर्व भागात मानपाडा छेद रस्त्यावरील संत नामदेव पथाच्या काँक्रिटीकरणाचे दुसऱ्या टप्प्याचे काम ‘एमएमआरडीए’तर्फे सुरू आहे.

प्राधिकरणातर्फे या रस्त्यांवरील दुतर्फाच्या गटारांची कामे केली जात आहेत. नव्याने बांधण्यात आलेल्या गटारांच्या झाकणावर ‘बी. एम. सी.’ (मुंबई महानगरपालिका), ‘एमएमआरडीए’ असा शिक्का असलेली झाकणे बसविण्यात आली होती. ही बाब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याविषयी पालिका अधिकाऱ्यांना विचारले असता.

एमएमआरडीए अंतर्गत हे काम करत असल्याने आम्हाला काही माहिती दिली जात नाही असे सांगितले जात असल्याचे थरवळ सांगतात. एमएमआरडीएचे काम सुरु असल्याने एकवेळ एमएमआरडीएची झाकणे समजू शकतो आपण परंतू बीएमसीची झाकणे कशी काय असा सवाल त्यांनी केला आहे. बीएमसी मधील काम पूर्ण झाल्यानंतर तेथील देयक काढून झाल्यावर तेथील उरलेली झाकणे येथे वापरण्याचा प्रयत्न सुरु आहे का ? असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

या झाकणांविषयी विचारणा झाल्यानंतर एमएमआरडीएने ही झाकणे सध्याच्या घडीला हटविली आहेत. परंतू यापूर्वी देखील डोंबिवली पश्चिमेतील काही रस्त्यांवर अशाच पद्धतीने बीएमसीची झाकणे बसविण्यात आल्याचे दिसून आले आहे.

रस्ते केडीएमसीचे, निधी एमएमआरडीएचा आणि यात बीएमसीची झाकणे आली कशी. याच एकच कारण की या कामामध्ये टेंडर काढून मोकळे झालेत सगळे पण ती कामे कशी, कोणत्या पद्धतीने होणार याची कोणी ही जबाबदारी घेत नाही. आयुक्त डॉ. दांगडे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. त्यांनी यासंबंधी पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले. शेवटी या रस्त्याची मालकी ही केडीएमसीची असून हे रस्ते चांगले कसे होतील त्यावर लक्ष देणे पालिकेचे काम आहे.

- सदानंद थरवळ, कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख (ठाकरे गट)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com