Illegal Building : डोंबिवलीतील ती बेकायदा इमारत अखेर भुईसपाट

डोंबिवलीतील मानपाडा रोडवरील गावदेवी मंदिराजवळील उद्यानाच्या आरक्षित जागेवर बेकायदा इमारतीची बांधणी करण्यात आली होती.
Crime on Illegal Building
Crime on Illegal Buildingsakal

डोंबिवली - डोंबिवलीतील मानपाडा रोडवरील गावदेवी मंदिराजवळील उद्यानाच्या आरक्षित जागेवर बेकायदा इमारतीची बांधणी करण्यात आली होती. या इमारतीवर कारवाई करण्यास पालिका प्रशासन दिरंगाई करत होते.

बेकायदा इमारत उभारणी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. उच्च न्यायालयाने ही बेकायदा इमारत भुईसपाट करण्याचे आदेश मागील महिन्यात पालिका प्रशासनास दिले होते. त्यानंतर इमारतीवर हातोडा मारला पण इमारत पूर्ण पाडण्यात आली नव्हती. अखेर गेले दोन दिवस दिवसरात्र काम करत पालिकेने ही इमारत जमीनदोस्त केली आहे.

या बेकायदा इमारतीवर कारवाई करण्यात आल्याने नागरिकांनी कल्याण डोंबिवली परिसरात अनधिकृत बांधकामांचे जाळे पसरले आहे. 65 बेकायदा बांधकामांची चौकशी सुरू असतानाही भूमाफिया या कारवाईला न जुमानता बेकायदा इमारती उभारत आहेत. अशाच पद्धतीने डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोडवरील गावदेवी मंदिराजवळ जागा उद्यानासाठी आरक्षित असताना त्यावर बेकायदा इमारत उभारणी करण्यात आली होती.

या इमारतीचे काम सुरू असल्यापासून वृत्तपत्रातून सकाळ ने याविरोधात आवाज उठविला होता. कधी चौकशी सुरू आहे, तर कधी पोलीस बंदोबस्त मिळत नाही म्हणून या इमारतीवर कारवाई करण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करत होते. तसेच पोलीस देखील पालिकेला स्वतंत्र पोलीस बळ देण्यात आले आहे असे सांगत हात काढून घेत होती.

यामध्ये काही राजकीय पदाधिकारी पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्यावर दबाव आणत असल्याची, तसेच पालिका अधिकारी देखील या भूमाफियाना सहकार्य करत असल्याने जोरदार चर्चा होती. ही सात माळ्याची बेकायदा इमारत बांधून पूर्ण झाली.

वर्दळीच्या रस्त्यात बेकायदा इमारत उभी राहत असताना पालिका आयुक्तांसह फ प्रभाग अधिकारी या इमारतीवर कारवाई करत नसल्याने नागरिकांमध्ये खूप नाराजी होती. या इमारती विषयी पालिकेत तक्रारी वाढल्याने दोन वेळा या इमारतीवर किरकोळ तोडकामाची कारवाई पालिकेने केली होती.

भुमाफियांनी तोडलेले बांधकाम पूर्ण करुन इमारत निवास योग्य केली होती. या इमारतीच्या जमिनीची बनावट कागदपत्र तयार करुन या इमारतीची जमीन खासगी मालकीची आहे असे दाखवण्याचे नियोजन भूमाफियानी केले होते.

पालिका अधिकारी या बेकायदा इमारतीवर कारवाई करत नसल्याने वास्तुविशारद संदीप पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या इमारतीवर कारवाई करण्यासाठी पालिकेने आदेश देण्याची मागणी केली होती.

न्यायालयाने आदेश देऊनही या इमारतीचे पाडकाम अतिशय संथगतीने पालिकेच्या फ प्रभाग कार्यालयाकडून सुरू होते. या इमारतीवर आक्रमक कारवाई केली तर बाजुलाच्या मंदिराला धोका होईल म्हणून संथगतीने ही कारवाई केली जात असल्याचे कारण पालिका अधिकारी देत होते. या संथगती कामाविषयी याचिकाकर्ते पाटील यांनी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.

आयुक्तांनी दोन दिवसात ही इमारत जमीनदोस्त करण्याचे आश्वासन पाटील यांना दिले होते. त्याप्रमाणे फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी रात्रंदिवस जेसीबी, शक्तिमान यंत्राच्या साहाय्याने दोन दिवस काम करुन गावदेवी जवळील इमारत भुईसपाट केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com