Dombivali News : नववर्ष स्वागत यात्रेवर पावसाचे मळभ?

कोरोनाच्या कालखंडानंतर तेवढ्याच उत्साहात डोंबिवली शहरात नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
Dombivali Swagat Yatra
Dombivali Swagat YatraSakal
Summary

कोरोनाच्या कालखंडानंतर तेवढ्याच उत्साहात डोंबिवली शहरात नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

डोंबिवली - कोरोनाच्या कालखंडानंतर तेवढ्याच उत्साहात डोंबिवली शहरात नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा गणेश मंदिर संस्थानचे 100 वे वर्ष तर नववर्ष स्वागत यात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने स्वागतयात्रेचा उत्साह काही औरच पहायला मिळत आहे. यात्रेची तयारी पूर्णपणे झाली असून नियोजित कार्यक्रम देखील पार पडत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पडणाऱ्या पावसाने नागरिकांची चिंता थोडी वाढली आहे. मंगळवारी पहाटे झालेल्या पावसामुळे नववर्ष स्वागत यात्रेवर देखील पावसाचे मळभ आहे. पाऊस आला तरी तेवढ्याच उत्साहात स्वागत यात्रा मोठ्या उत्साहात पार पडेल तशी तयारी देखील करण्यात आली असल्याची माहिती श्री गणेश मंदिर संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी विविध जाती, प्रांत, धर्माच्या ग्रामस्थांना एका व्यासपीठावर आणावे, या विचारातून डोंबिवलीत पहिली नववर्ष स्वागत यात्रा सुरू केली. गुढीपाडव्या निमित्त डोंबिवलीतून निघणाऱ्या या स्वागत यात्रेची पुढे प्रथाच पडली. यंदाचे या नववर्ष स्वागत यात्रेचे 25 वे वर्ष आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यंदा स्वागत यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गणेश मंदिर संस्थान तर्फे गेल्या आठवडाभरापासून विविध सांस्कृतिक सामाजिक अध्यात्मिक उपक्रम हाती घेण्यात आलेत.

या नववर्षी यात्रेत उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,आमदार राजू पाटील ,विविध सिनेकलाकार देखील उपस्थित राहणार आहेत. उद्या नववर्ष स्वागत यात्रा असल्याने डोंबिवली फडके रोड परिसरात आकर्षक अशी सजावट करण्यात आलीये. स्टेज उभारण्याचा देखील काम सुरू आहे. दरम्यान मंगळवारी अवकाळी पावसाने कल्याण डोंबिवलीत जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे गणेश मंदिराच्या आवरातील मोठी रांगोळी खराब झाली. त्यामुळे अवकाळी पावसाळ्याचे नववर्ष स्वागत यात्रेवर देखील मळभ साचले आहे.

Dombivali Swagat Yatra
Mumbai Politics : शिंदे यांचे धनुष्यबाण ठाकरेंचे गड भेदणार?

उद्या देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय त्यामुळे या नववर्ष स्वागत यात्रेवर पावसाचा सावट असणार आहे. मात्र स्वागत यात्रेसाठी नागरिकांमध्ये उत्साह आहे .स्वागत यात्रेची तयारी देखील करण्यात आली आहे. त्यामुळे जरी उद्या पाऊस पडला तरी स्वागत यात्रा त्याच जल्लोषात, उत्साहात निघणार असे गणेश मंदिर संस्थानचे विश्वस्त सुहास आंबेकर यांनी सांगितले.

डोंबिवली स्वागत यात्रेच्या मार्गांवर राजकीय फलकबाजी...

डोंबिवली मधील स्वागत यात्रेच्या मार्गांवर आणि शहारत मोठ्या प्रमाणात राजकीय मंडळीनी फलकबाजी आणि कमानी उभ्या केल्या आहेत. फलकबाजी करण्यात भाजप आणि शिवसेना पक्षात चढाओढ दिसून येत आहे. शिवसेना-भाजपच्या चढाओढीतून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन स्वागत यात्रेच्या माध्यमातून लोकांसमोर जाण्याचा प्रयत्न शिवसेना, भाजपच्या नेत्यांनी केला असल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com