esakal | डोंबिवलीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा | Shivsena
sakal

बोलून बातमी शोधा

Dombivali rada

डोंबिवलीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : एमआयडीसीतील (MIDC) मिलापनगर परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा (Road work) जाब विचारल्या प्रकरणी शिवसेना (shivsena) व राष्ट्रवादी कार्यकर्ते (NCP) आपआपसात भिडले. या मारामारीत राष्ट्रवादीचे तीन ते चार कार्यकर्ते जखमी (politician injured) झाले असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारले असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला असता, आम्ही त्यांना पालिकेत (KDMC) जाऊन विचारा असे सांगितले. याचा राग येऊन त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचे सेनेचे म्हणणे आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात (manpada police station) शिवसेना राष्ट्रवादीचे मोठे पदाधिकाऱ्यासह कार्यकर्ते जमले होते. यामुळे डोंबिवलीतील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.

हेही वाचा: भोसरी जमीन घोटाळा प्रकरण : मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा

डोंबिवली एमआयडीसी परिसरात रस्ते दुरुस्तीची कामे सुरू आहेत. गुरुवारी दुपारी काम सुरू असताना एका नागरिकाने तेथील उपस्थित लोकांना हे काम बरोबर नाही, पाठी मागील रस्त्यावर खड्डे पडले पण असे बोलले. यावेळी तेथे उपस्थित शिवसेना कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला नीट उत्तर न दिल्याने बाजूलाच उभ्या असलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जाब विचारला. याचे रूपांतर वादात होऊन दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये राष्ट्रवादीचे चार ते पाच कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

रस्त्यावरील सुरू असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा जाब विचारल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव तेजस पाटील यांनी केला आहे. तर युवा सेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभेचे जिल्हा समन्वयक योगेश म्हात्रे म्हणाले, रस्त्याचे काम सुरू असताना राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला असता, आम्ही त्यांना पालिकेत जाऊन विचारा असे सांगितले. याचा राग येऊन त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली असे सांगितले. महाविकास आघाडीतील राजकीय पक्षातील कार्यकर्तेच आपसात भिडल्याने आता याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल होतो का? की दोन्ही पक्ष तडजोड करून हा वाद मिटवतात हे पहावे लागेल.

loading image
go to top